एकत्र कुटुंब..हे कुटुंब तब्बल २७ जणांचे..स्वतः तर जगतात,आणि आपल्या शेतीलाही मस्तपैकी जगवतात.
एकत्र कुटुंब.. हे कुटुंब तब्बल २७ जणांचे..स्वतः तर जगतात,आणि आपल्या शेतीलाही मस्तपैकी जगवतात. आजच्या शहरी विभक्त कुटुंबपद्धतीत आदर्श .. कोल्हापूरतील हे कुटुंब तब्बल २७ जणांचे आहे. साबण, मीठ आणि चहापावडर या तीनच वस्तू ते विकत आणतात. बाकी तीळ, खसखसपासून ते वर्षभर पुरेल एवढ्या भाज्या, फळे, तेल, धान्य, डाळी ते शेतात पिकवतात. आवळ्यापासून फणसापर्यंत सगळ्या फळांचा मनसोक्त आस्वाद घेतात. बहुतेक पिकांसाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर केल्यामुळे हिरव्यागार टवटवीत भाज्या आहारात रोज वापरतात. सांगायची गोष्ट एवढीच, की घरातले सगळे मनापासून शेतावर राबतात आणि आनंदी, आरोग्यदायी जीवन जगतात. कोगे (ता. करवीर) येथील लहू सावबा मोरे यांच्या कुटुंबाची ही ताजी टवटवीत करणारी एक कथाच आहे. करवीर तालुका तसा शेतीच्या दृष्टीने सधन. मोरे कुटुंबाचीही साधारण 12 एकर जमीन. सगळा नुसता ऊस लावला तरी वर्षभर व्यवस्थित जगू शकणारं हे कुटुंब. पण, शेतीत स्वतः राबून, नवे प्रयोग करून विविध पिकं पिकवण्याचा या कुटुंबाला ध्यास. त्यामुळे केवळ उसावर भर न देता त्यांनी वेगवेगळ्या पिकांवर भर दिला आणि बाहेरून घरात फारसं विकत आणावया...