Posts

Showing posts with the label Beed

विजयसिंह राजे पंडित यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदारांनी पुढाकार घेतल्यास नक्कीच जिल्ह्यात येत्या पाच वर्षाच्या आत विमानतळ उभे राहील .

श्रेयासाठी याला त्याला नावे ठेवू नका.. आपले सर्व लोकप्रतिनिधी आपापली जबाबदारी चांगल्या प्रकारे ओळखून आहेत जो तो लोकप्रतिनिधी ज्याच्या त्याच्या परीने जिल्ह्याच्या विकासात योगदान देत आहे.. व सर्वांनी द्यायला देखील पाहिजे...!!   लोकसभेत बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी बीड येथे विमानतळ करावे ही मागणी केली होती त्यावेळेस बऱ्याच जणांनी विशेषतः बीड जिल्ह्यातीलच असलेल्यांनी टिंगल टवाळी करत अपमान करण्याचा प्रयत्न केला.. मात्र बजरंग बप्पा थांबले नाहीत..   केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी बीडच्या आजूबाजूला दोन ठिकाणी विमानतळ होऊ शकते अशा जागा देखील सुचवल्या व त्या पद्धतीने केंद्र सरकारकडून विचारणा देखील झालेली आहे..  यामध्ये आता गेवराईचे आमदार विजयसिंह राजे पंडित यांनी देखील विधानसभेत पाठपुरावा केला असता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज याबद्दल घोषणा केली.. त्याची सुरुवात खासदार बजरंग बाप्पांनी केलेली आहे तर याचा राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे काम सत्ताधारी आमदार विजयसिंह राजे पंडित यांनी केले आहे..    केंद्रात बाप्पांनी तर राज्यात विजयसिं...