गहाण ‘मिशी’
गहाण ‘मिशी’ खंडु पाटील मंजे गावातली नामी आसामी व्हती.आजुबाजुच्या दहा पंधरा खेड्यायतं गड्याचा रूतबा व्हता.गावातुन गडी निस्ता चालला तरी गावातल्या बायाबापड्या तटतट उठुन घरात पळायच्या.आलुतेदार बलुतेदार त्याच्या दाराम्होरून जातांनी पायतान हातात घेउन पुढ जातं.आसा गड्याचा रूबाब व्हता.लहानपणापसुन आखाड्यात कुस्त्या खेळुन पाटलानं शरीर कमावलं व्हतं.भल्याभल्या पैलवानांना त्यानं आखड्यातं पाणी पाजलं व्हतं.पंचक्रोशीत लय दिलदार माणुस मनुन प्रसिद्ध व्हता.त्याच्या दारालं आलेला दिन दुबळा कव्हाच रिता गेला नाही.पाटील जसा आडदांड व्हता तसाचं मानी, शब्दाचा पक्का,अभिमानी आन ईज्जतीलं जपणारा व्हता. आमचा आजा सांगायचा.आसाचं गावात एकदा एक रोह्यल्या पहिलवान आलता.दुसर्या मुलखातुन येवुन त्यो रोह्यल्या याजबट्ट्याचा धंदा करायचा.आमच्या गावातबी त्या रोह्यल्यानं याजानं पैकं वाटलेले व्हते.आज त्यो रोह्यल्या वसुलीलं आलता.पावसानं साथ न देल्यानं त्यासाली कुणबीक पिकली नवती.रोह्यल्याच्या दहशतीखाली लोकं रानावनायत जाऊन लपून बसले व्हते.ईकडं घरोघर जाऊन रोह्यल्या बायका पोरायलं धमकाऊ लागला.सगळं गावं ना...