जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अमरसिंह पंडित साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त जेष्ठ पत्रकार श्री. संजय मालानी सर यांनी लिहिलेला लेख...
#अभिष्टचिंतन जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अमरसिंह पंडित साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त जेष्ठ पत्रकार श्री. संजय मालानी सर यांनी लिहिलेला लेख... धेय्यासक्त व्यक्तिमत्व संजय मालाणी --- एखाद्या विषयात 'अभ्यास' करून एखाद्या धेय्याची निश्चिती करायची आणि मग त्यासाठीचा पाठपुरावा करायचा, त्यासाठी प्रसंगी कोणाचाही विरोध सहन करण्याची तयारी ठेवायची, कोणताही संघर्ष करण्याची तयारी ठेवायची पण ते धेय्य साध्य करायचेच असे व्यक्तिमत्व म्हणून माजी विधिमंडळ सदस्य अमरसिंह पंडित यांच्याकडे पाहता येईल. बीड जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्याचा विषय असेल किंवा शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, अमरसिंह पंडित यांची भूमिका नेहमीच आठवणीत राहील अशी राहिली आहे. --- मुंबईमध्ये अनेक ज्येष्ठ पत्रकारांसोबत ज्यावेळी बोलणे झाले, विशेषतः विधिमंडळ वृत्तांकन करणारे पत्रकार ज्यावेळी भेटतात, त्यावेळी बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीची आठवण ते हमखास काढतात, ती व्यक्ती म्हणजे अमरसिंह पंडित. राज्य विधिमंडळाचे माजी सदस्य ( विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहात त्यांनी काम केल...