ह.भ.प. करिती जातीचा जप संसाराचा फास तोडणारे महाराज जातीच्या मोह पाशात
ह.भ.प. करिती जातीचा जप संसाराचा फास तोडणारे महाराज जातीच्या मोह पाशात टीप - सगळे नाही ..... विठोबाच्या पायरीवर संत चोखाची समाधी , जातीने महार पांडुरंग वारी करी असा एकच संत सावता बाबा जातीने माळी , जात्यावर जिच्यासोबत दळण पांडुरंगाने दळले ती संत जनाबाई मातंग आई बापाची लेक , नामदेवाच्या घरी मोलकरीण राहिली आणि संत पदाला पोहचली , अहो संत कान्होपात्राची आई गणिका , म्हणजे वेश्येची मुलगी ज्या संप्रदायाने संत पदावर आरूढ केली , संत नरहरी सोनार , संत गोरा कुंभार हे उदाहरणे मी का सांगतोय माहितीय , वारकरी संप्रदाय समता आणि मानवता शिकवताना कधीच जातीच्या मर्यादेत वेढला गेला नाही , अहो संत कबीर मुस्लीम , म्हणून गेली ८०० वर्षाचा वसा वारसा असलेला हा संप्रदाय कुठल्या एका जात धर्माच्या मर्यादेत जगाच्या कल्याणाची परिभाषा केली नाही , बुडते हे जन न देखे डोळा असाच प्रबोधनाचा कर्तव्यभार आजवर कीर्तनकारांच्या खांद्यावरून वाहिला गेला , शब्दांची फेक , गायन , वक्तृत्व सिद्धता हि कलाकारांची लक्षणे आहेत , कीर्तनकार संत यांना जात धर्माचा पाश बाधत नसतो आणि ज्या कुठल्या कीर्तनकारास जात धर्...