Posts

Showing posts from September 29, 2023

*पोहोचलो रे , पेताडांनो*पुढच्या वर्षी लवकर येणार नाही , पत्र गणपतीचे *क्रॉसलाईन*

Image
*पोहोचलो रे , पेताडांनो* पुढच्या वर्षी लवकर येणार नाही , पत्र गणपतीचे *क्रॉसलाईन*      पार्वती मातेने मला झोडपून काढले , गण्या म्हणू म्हणू माझी टीर लाल केली . असेच पूर्वी कधीच झाले नव्हते , अंगावर गुलाल म्हणावा तर प्रत्येक वर्षी गुलाल असायचा , मग याच वर्षी असा प्रसाद का मला काही कळेना , म्हणे तुला मोदक खायला पाठवले होते का दारू प्यायला , मी म्हटलो नाही मी नाही पिलो तर तिने पितांबर अंगावर फेकून विचारले , वास घे . पितांबर नाकाला लावला आई शपथ . यावर्षी पत्ते खेळणारे भक्त चक्क दारूत माझ्या मिरवणुकीत होते , माझ्या लक्षात आले अरा अरा कहार येताना झालाय . माझ काही नाही मी तुम्हाला नेहमी एड्जस्ट करत आलोय रे , मात्र दारू म्हणजे जास्तच होतेय . लई हिंदू हिंदू करता , कुणी आपल्या देवाला दारू पिऊन भंजते का , इथे नाही का हिंदुत्व खतऱ्यात , काय दिवस होते राव ते , गणपती मेळे असायचे लोक जात धर्म विसरून जायचे आता मात्र जात निहाय गणपती असतात , साळी गल्लीचा गणपती , कोळी गल्लीचा राजा , लालबाग चा राजा , सगळ तुमच्या साठी असते माझ्या साठी काही नसते . ज्या लेकरांना समज यायची म्हणजे १० व...

आकाश पाळण्याची हौस चांगलीच फीटली; पाळणा वर जाताच केस अडकले अन्; पुढे काय घडलं?

Image
आकाश पाळण्याची हौस चांगलीच फीटली; पाळणा वर जाताच केस अडकले अन्; पुढे काय घडलं? गावात किंवा शहरात यात्रा असली की, लोकं प्रचंड गर्दी करतात. विविध प्रकारचे पाळणे हे यात्रेचं प्रमुख आकर्षण असतं. पाळणे दिसले की, लहान मुलांसह मोठ्यांनाही पाळण्यात बसण्याचा मोह आवरत नाही. तुम्हीही यात्रेत गेल्यानंतर एकदा तरी आकाश पाळण्यात बसलेच असाल, मात्र व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे विचार बदलू शकतात. काय आहे नेमका प्रकार? जाणून घ्या. यात्रेत लांबून पाहिलं तरी उंच आभाळात गोल फिरत असलेला आकाश पाळणा स्पष्ट दिसतो. हा पाळणा पाहून कोणालाही त्यात बसण्याची इच्छा होते. मात्र आकाश पाळण्यात बसणं एका तरूणीला महागात पडलं आहे. नुकताच एका यात्रेतील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात तुम्ही पाहु शकता की, काही लोक आकाश पाळण्यात असलेल्या तरुणीचे केस कापताना दिसून येत आहेत. या तरूणीचे केस स्विंगमध्ये अडकले आहेत. काही लोक वर जाऊन सुरीने तिचे केस कापताना दिसून येत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आकाश पाळणा सुरू झाला. २ फेऱ्या झाल्यानंतर अचानक ओरड...