Posts

Showing posts from October 7, 2023

#अभिमानास्पद....आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाने तब्बल 100 हून अधिक मेडल जिंकून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

Image
#अभिमानास्पद.... आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाने तब्बल 100 हून अधिक मेडल जिंकून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. यात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी नेत्रदीप कामगिरी करून सिंहाचा वाटा उचलला. खेळाडूंची ही कामगिरी जागतीक स्तरावर देशाचा अभिमान उंचावणारी आहे.  पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार सोहळ्यामध्ये महाराष्ट्रची कन्या आदिती स्वामी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावेल असा विश्वास व्यक्त केला होता. तो विश्वास तिने सार्थ ठरवला. उत्कृष्ट कामगिरी करत देशासाठी सुवर्ण पदक मिळवून दिले. त्याबद्दल तिचे व पदक विजेत्या सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन ....💐

बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा पदभार

Image
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज बीड येथे जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांच्या कामकाजाचा समग्र आढावा घेतला.  जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, स्वामी रामानंद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व शासकीय दवाखान्यातील उपलब्ध औषध साठा तसेच त्या औषध साठ्यात कुठेही कमतरता भासणार नाही, यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.  आगामी काळातल्या पाणीटंचाई, चारा टंचाई, भूमी अधिग्रहण तसेच जलस्रोतांचे अधिग्रहण, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून हाती घ्यावयाची विशेष कामे, यांबद्दल सविस्तर सूचना केल्या आहेत.  आगामी रब्बी हंगामात पीक कर्जाचे उद्दिष्ट 700 कोटींवरून वाढवून 900 कोटी करण्यात आले आहे. सन 2022 मधील अतिवृष्टीचे व सन 2023 मधील अवकाळी पावसाचे अनुदान वितरण करण्यातील काही त्रुटी दूर करून शक्य तितक्या लवकर उर्वरित शेतकऱ्यांना 100% अनुदान वितरित करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनास दिले आहेत.  मुख्यमंत्री सौर कृषी योजनेतून शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवुन देण्यासाठी या ...

ग्रामीण संघर्षमय व हृदयस्पर्शी कादंबरी " हेलपटा " ................. तुमचं आमचं जगणं म्हणजेच ,, हेलपाटा ,, " बिजलेला बाप " एक आठवण ............!!!

Image
ग्रामीण संघर्षमय व हृदयस्पर्शी कादंबरी " हेलपटा " .................     तुमचं आमचं जगणं म्हणजेच ,, हेलपाटा ,,                      " बिजलेला बाप "     एक आठवण ............!!! १९८४ साल उजाडलं आम्ही सर्वजन वाण्याच्या गुर्‍हाळावरचं राहु माधवनगरला रहात होतो . रखरखनारा उन्हाळासंपुन पावसाळा सुरु झालेला होता . जास्त पाऊस लागला तर गुर्‍हाळ चार-चार दिवस बंद रहायचे . आषाढ महीना संपुन श्रावणाचे आगमन झाले होते . पावसाळ्यात खुप पाऊस पडला तर सर्वञ चिखलाचे साम्राज्य पसरायचे . गुराढोरांना चारासुद्धा आणता येत नव्हता . अशातचं मंगलताईचं लग्न करायचं हे भाऊंच्या डोक्यात होतं . दिवाळी झाली व तुळशीचे लग्न झाले की देवू बार उडवून असे भाऊंनी मनोमन ठाणले होते .पैसा तर एक जवळ नव्हता ! वाण्याकडुन उचल घ्यायची म्हणलं तर वाणी उचल द्यायचे एक हजार .... ती फेडायला पुढं वर्ष जायचं ! उचल काय फिटत नसे पुन्हा कर्जाचा बोजा अंगावर रहायचा .                उचल आणणेसाठी 'बापुशेठ ' भाऊंना गावात ब...