Posts

Showing posts with the label Maharashtra

डी. गुकेश याने विश्वविजेता होण्याचा बहुमान मिळवला आहे.

Image
सिंगापूर येथे सुरू असलेल्या विश्व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा डी. गुकेश याने विश्वविजेता होण्याचा बहुमान मिळवला आहे. डी. गुकेश हा जगातील सर्वात कमी वयाचा विश्वविजेता होण्याचा विश्व विक्रम आपल्या नावे रचला असून, ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. विश्वविजेता डी. गुकेश याचे मनःपूर्वक अभिनंदन! #Chess #GukeshDing #Gukesh #ChessChampionship

अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव येथील

Image
◆ आदर्श घ्यावा असे काही... हे वाचताना डोळ्यातून आसवं ओघळणारच.. आमच्या अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव येथील "भुसारे" परिवारातील दोन मुलींच्या लग्नात मामाचे विधी बाबा भाई पठाण यांच्या हस्ते संपन्न झाले.  त्या मुलींची आई दरवर्षी "बाबाभाई" ना राखी बांधते  कारण तिला सख्खा भाऊ नाही.  भावाची व मामाची भुमिका "बाबाभाई" पठाण यांनी बजावली.  सामाजिक ऐक्याचा एक डोंगराएव्हढा आदर्श उभा केला... सलाम ह्या नात्याला !! - देवा झिंजाड सुभेदार पोस्ट जुनीच आहे परंतु सामाजिक ऐक्यासाठी फार प्रेरणादायक आहे म्हणून आपणास शेअर केले

आम्ही चांगले असू किंवा वाईट, पण आमचाही एक #जमाना' होता

Image
आमचाही एक जमाना होता  बालवाडी हा प्रकार नव्हता, पुढे 6 वर्षा नंतर स्वतःच शाळेत जावे लागत असे , सायकलने/ बसने पाठवायची पद्धत नव्हती, मुलं एकटी शाळेत गेल्यास काही बरे वाईट होईल अशी भीती आमच्या आई वडिलांना कधी वाटलीच नाही.      🤪   पास / नापास हेच  आम्हाला कळत होतं... टक्केचा आणि आमचा संबंध कधीच नव्हता. 😛  शिकवणी लावली,  हे सांगायला लाज वाटायची....  कारण "ढ" असं  हीणवलं जायचं...  🤣🤣🤣 पुस्तकामध्ये झाडाची  पानं आणि मोरपिस ठेवून  आम्ही हुशार होऊ शकतो,  असा आमचा दृढ विश्वास  होता... ☺️☺️ कापडाच्या पिशवीत आणि नंतर चैन म्हणून पत्र्याच्या पेटीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मिती कौशल्य होतं. 😁 दरवर्षी जेव्हा नव्या इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी, पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणे, हा आमच्या जीवनातला एक वार्षिक उत्सव असायचा... 🤗  वर्ष संपल्यानंतर पुस्तके विकणे आणि विकत घेण्यात आम्हाला काहीही लाज वाटत नसे. 🤪 आई वडिलांना आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजाही नव्हते.  ...

व्हॉट्सअप,इन्स्टा,रील्स,यु ट्युब,गावोगावचे हजारो चँनल्स,हजारो बाबा,दादा,महाराज, किर्तनकार आदीं यात भरपूर तेल ओतताहेत

Image
बसमध्ये प्रवास करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे जनमानस कळतं.कोणाशी काहीही न बोलता,त्यांच्या जगात काय चाललंय याचा अंदाज येतो.माणसं परिस्थितीनं गांजून,वैतागून गेलीत. पण ही स्थिती कशामुळं निर्माण झालीय, याचं आकलन त्यांना होत नाही. असा समाज अधिकाधिक अंधश्र्ध्द,देव-धर्माला शरण जातो.आधीच समाज कालबाह्य रूढी-परंपरेत अडकलेला.त्यात अशी परिस्थिती. मी बारकाईने बघतो तेव्हा कळतं , हे मनोरुग्ण आहेत.विचार करण्याची क्षमताच त्यांनी गमावलीय.त्यात व्हॉट्सअप,इन्स्टा,रील्स,यु ट्युब,गावोगावचे हजारो चँनल्स,हजारो बाबा,दादा,महाराज, किर्तनकार आदीं यात भरपूर तेल ओतताहेत .प्रत्येकजण यापैकी कुठल्या ना कुठल्या सत्संगात तल्लीन आहेत.बसमध्येही कमी-जास्त हेच चित्र दिसतं.प्रत्येकजण यात व्यस्त आहे. वरवर साधी, सरळ वाटणारी माणसं कुठल्याही शुल्लक कारणावरून हाणामारीवर उतरतील ते सांगता येत नाही. बसमध्ये जागेवरून,खिडकी उघडी ठेवायची की बंद,यावरून एक-दोन भांडण होतातच.माणसं परिस्थितीसमोर अगतिक आहेत पण दुबळ्यासमोर आक्रमक आहेत.धार्मिक आहेत पण माणूस बनलेली नाहीत. माणूसपण कशाला म्हणतात तेच माहित नाही. त्यामुळं लोकश...

आणि शेतकरी विठ्ठल हसला...

Image
आणि शेतकरी विठ्ठल हसला... आज सकाळी सकाळी  किचन मध्ये काम चालू होते आणि कानावर आवाज आला “कढीपत्ता एक रुपया कढीपत्ता एक रुपया “ किचन च्या खिडकीतून डोकावून बाहेर पाहिले तर एक ७५ – ८० वर्षाचे बाबा हातात दोन पिशव्या घेऊन कढीपत्ता विकत होते. एव्हढ्या वयात थकलेले शरीर असताना सुद्धा काम करावे लागते हे पाहून मला जरा वाईट वाटले आणि मी त्यांना आवाज दिला. म्हटलं बाबा समोरून या. बाबा गेट उघडून आत आले. थकलेले शरीर, फाटलेले बूट पण तरीही कष्ट काही चुकेलेले नाहीत. तसही मला जरा शेतकऱ्यांविषयी कळवळा आहे म्हणून म्हटलं बाबांच अर्थकारण थोडंस समजून घेवूया. बाबाला विचारले बाबा तुम्ही घरदार फिरून फिरून ही कढीपत्त्याची गड्डी तुम्ही एक रुपयाला विकत आहात काय पुरते तुम्हाला ? आणि हीच गड्डी तर भाजी मार्केट मध्ये ५ रुपयाला मिळते. बाबा म्हणाले बाई परिस्थिती लय खराब हाय. सुरुवातीला चांगला आला पाऊस पण मध्यात लय उघडीप दिली. शेतीच पार वाटूळ झाल. लय खराब हालत हाय.  पहाटच्या  ७ वाजल्यापासून हा कढीपत्ता घेऊन फिरून राहिलो, म्हणल 3 रुपया ला एक जुडी विकीन पण अर्धा घंटा फिरून बी एक जुडी विकल्या नाही गे...

*श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवाय।।। ...

Image
*श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवाय।।। ... *भगवान श्रीकृष्णांबद्दल उत्कृष्ट माहिती* ➖➖➖➖➖➖➖➖➖ *आरोग्यसंहिता* ➖➖➖➖➖➖➖➖➖ *जशी प्राप्त झाली तशी* १) भगवान श्रीकृष्णांचा जन्म ५२५२ वर्षांपूर्वी झाला  २) जन्मतारीख १८ जुलै,३२२८ ई.स. पूर्व  ३) महिना: श्रावण  ४) दिवस: अष्टमी  ५) नक्षत्र: रोहिणी  ६) दिवस: बुधवार  ७) वेळ: १२:०० रात्री ८) श्री कृष्ण १२५ वर्षे, ८ महिने आणि ७ दिवस आयुष्य.  ९) अवतार समाप्तीची तारीख १८ फेब्रुवारी ३१०२ ईसा पूर्व १०) जेव्हा कृष्ण ८९ वर्षांचे होते महायुद्ध (कुरुक्षेत्र युद्ध) झाले. ११) कुरुक्षेत्र युद्धानंतर ३६ वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला. ११) कुरुक्षेत्र युद्ध मृग नक्षत्र शुक्ल एकादशी, १३३९ रोजी सुरु झाले होते. १२) २१ डिसेंबर १३३९ ईसा पूर्व रोजी "दुपारी ३ ते संध्याकाळी ५ दरम्यान सूर्यग्रहण होते (जयद्रथच्या मृत्यूचे कारण.) १३) भीष्म २ फेब्रुवारी, (उत्तरायणाची पहिली एकादशी), ३१३८ ईसा पूर्व अवतार समाप्ती. *कृष्णाची भारतातील प्रत्येक राज्यात वेगळ्या नावाने पूजा केली जाते.* मथुरेत कृष्ण, कन्हय्या  ओडिशामध्...

सर्वच मुला/मुलींकडे दोन गणवेश नसतील..!

Image
जहागीरदार लोकांनो पावसाळ्यात चार चाकी गाड्या चालवताना शाळेच्या मुलामुलींची काळजी घ्या, त्यांचे अंगावर चिखल पाणी उडणार नाही असे वाहन चालवा, पावसाळ्यात आपली कार /मोटारसायकल हळूहळू चालवा. आपल्याकडे दोन वाहने असतील पण सर्वच मुला/मुलींकडे दोन गणवेश नसतील ..! 😞🙏

एकमेकांना सहकार्य करायला शिका .. मग काय फरक पडतो सरमोचा व्यक्ती ओळखीचा आहे कि परका, रक्ताच्या नात्यातला आहे कि मानलेला...चांगले कर्म करा देव त्याचे फळ तुम्हाला नक्कीच देईल..☺जय महाराष्ट्र...⛳

Image
सकाळी बस मधून प्रवास करताना एक अनुभव आला तो सांगतो.. . रोजच्या प्रमाणे बस मध्ये गर्दीच होती.. मी बस मध्ये चढलो माझ्या मागोमाग एक म्हातारे आजोबा चढले.. बाळा मला जरा पुढे जाऊदे असे म्हणताच मी त्यांना पुढे जायला जागा दिली.. पण तिथे एक सीट रिकामी होती.. गर्दीने भरलेल्या बस मध्ये ती एकच सीट रिकामी होती खिडकी जवळची सीट... आणि त्या सीट च्या बाजूच्या सीट वर एक तरुण मुलगी बसली होती.. त्या आजोबांनी तिला त्या सीट वर बसायला सांगितले..  आजोबा - पोरी थोडी तिकडे सरकतेस का मला बसुदे इथे.. मुलगी - दिसत नाही का तुम्हाला ? त्या सीट वर पावसाचे पाणी पडलंय ते ? आजोबा - पोरी मला इथेच थोड पुढे उतरायचं आहे थोड बसुदे.. मुलगी - एकदा सांगून कळाल नाही का ? कि वयानुसार अक्कल पण गेली? हा सर्व प्रकार माझ्या समोरच होत होता..  तिने एवढ्या उद्धट भाषेत बोलल्यावर माझी सटकली 😁 पण मी त्या मुलीला काही बोललो नाही..  सरळ माझ्या खिशातून रुमाल काढला ती सीट आजोबाना पुसून दिली आणि त्यांना बसायला सांगितले...  माझा हा प्रकार बघून तिची तिला लाज वाटली असावी..  कारण तिने लगेच मान खाली घातली.. आजोबा ...

" फाटकी झोळी "

Image
"""""""""""""""" """""""""""""""""     " फाटकी झोळी "       """""""""""""""""" जुण्याच वाटा, जुण्याच सवयी जुणेच माझे 'ओझे ' बाजाराच्या वेशिवरती 'काळीज ' जळते माझे .....! थेंब-थेंब पाणी देऊन दुष्काळात वाढवला ' मळा ' थोराड बाग वाचवण्या संञांची भुंडा केला पत्निचा गळा .....! वाटलं होतं औंदा तरी भरेल माझी फाटकी झोळी अवकाळीनं कंबरडं मोडलं  स्वप्नात राहीली ' पोळी ' .......! कापसाचा झाला चोथा सोयाबिनला आले ' कोंब ' जुनेच मढे बांधावरती कोठे मारावी आम्ही बोंब .....! आत्ता माञ गारा खाऊनच भरायचे काय ? आमचे पोट दगड फूलालाही जगणे आहे हिरवा ठेवा त्याचाही देठ ......!           ✍️ JD               

कादंबरी " हेलपाटा " 2023: """" """"""""""""" " झोळी "

Image
कादंबरी " हेलपाटा " 2023: """" """""""""""""     " झोळी "       """""""" बांधावरची मला खुनवते गावाकडची माती सर्जा-राजा तेथे राबतो जपूनी आपली नाती .....||धृ|| ढेकळाच्या मातीसंगे पीतो पाटाचे पाणी बाटली बंद पाणी नव्हे ते लागे आमृतावाणी ......||१|| शिवारात घुमतो तेथे कधी सोसाट्याचा वारा पावसासंगे खातो कधी वेदनेच्या तुफान गारा ........||२|| कधी सुखाचे-कधी दु:खाचे अश्रू दोन डहाळी आनंदाणे खातो चटणी- भाकर कधी भेटते पोळी .....||३|| आनंदाला सण उत्सव कधी येते होळी गुढी पाडव्याचा आनंद मोठा भरते त्याची साल भराची झोळी ..||४||             कादंबरी " हेलपाटा " 2023: """" """""""""""""     " झोळी "       """""""" बांधावरची मला खुनवते गावाकडची माती सर्जा-राजा तेथे राबतो जपूनी आपली नाती .....||धृ|| ...

मराठवाड्याची कामधेनू म्हणून जायकवाडी प्रकल्पाची ओळख आहे.

Image
मराठवाड्याची कामधेनू म्हणून जायकवाडी प्रकल्पाची ओळख आहे. ठरवून दिलेल्या पाणी वापरापेक्षा प्रकल्पाच्या उर्ध्व भागात गोदावरी नदीवर पाणी वापराची असंख्य धरणे बांधल्यामुळे जायकवाडी प्रकल्पात निर्धारीत पाणीसाठा उपलब्ध होत नाही. शासनाने सन 2005 मध्ये महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा अस्तित्वात आणला. या कायद्यात समन्यायी तत्वावर अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून माहे ऑक्टोबर महिन्यात जायकवाडी जलाशयामध्ये पाणी सोडण्याची तरतुद आहे. दुष्काळी परिस्थितीत जाणीवपूर्वक अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील राजकीय नेते शासनावर दबाव आणून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याला विरोध करतात. ज्या-ज्या वेळी मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होते त्या-त्यावेळी कायद्यातील तरतुदींना सुध्दा आव्हान देण्याचे काम नगर आणि नाशिक जिल्ह्यातील नेते करत असतात. सातत्याने समन्यायी पाणी वाटपासाठी मराठवाड्यातील नागरीक विशेषतः जायकवाडीच्या लाभक्षेत्रातील शेतकरी वेळोवेळी रस्त्यावर उतरून पाण्यासाठी झगडतात.   यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातही गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभागाने उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांमधू...

उमापूर महसुल मंडळातील १५६२ शेतकऱ्यांनी खरीप हंगाम सन २०१६ साठी ४९,२२,१८५ रुपयांचा पिक विमा हप्ता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उमापूर शाखेत जमा केला होता.

Image
उमापूर महसुल मंडळातील १५६२ शेतकऱ्यांनी खरीप हंगाम सन २०१६ साठी ४९,२२,१८५ रुपयांचा पिक विमा हप्ता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उमापूर शाखेत जमा केला होता. बँक कर्मचाऱ्यांनी महसुल मंडळाची चुकीची नोंद केल्यामुळे त्यावेळी हे सर्व शेतकरी पिक विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहिले. केवळ बँक कर्मचाऱ्यांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे १५६२ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही. शेतकऱ्यांचा हा प्रश्न त्यावेळी विधान परिषदेत लावून धरला. सभागृहातील आश्वासनानुसार विमा कंपनी, बँक आणि शासन प्रतिनिधी यांच्यासमवेत मंत्र्यांच्या साक्षीने बैठकाही संपन्न झाल्या, मात्र यातून मार्ग निघाला नाही. शेवटी सन २०१८ मध्ये शेतकऱ्यांच्यावतीने मा.उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात जनहितार्थ याचिका क्र.७३/२०१८ दाखल केली. याचिकेत दि.२४ जानेवारी २०१९ रोजी न्यायालयाने आदेश पारीत करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७ टक्के व्याजदराने नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याचे आदेश दिले.  स्टेट बँक ऑफ इंडियाच्यावतीने मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाला मा.सर्वोच्च न्यायालयात आव्हानीत करण्यात आले. मा.स...

'जोपर्यंत योगी पंतप्रधान होत नाहीत तोपर्यंत मी 5 किलो चांदीचे बूट घालणार नाही कारण...', गोल्डन बाबांची शपथ

Image
'जोपर्यंत योगी पंतप्रधान होत नाहीत तोपर्यंत मी 5 किलो चांदीचे बूट घालणार नाही कारण...', गोल्डन बाबांची शपथ कानपूरचे गोल्डन बाबा मनोज सिंग उर्फ मनोजानंद हे नेहमीच त्यांच्या व्हिडिओ आणि सोन्याच्या दागिन्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी पंतप्रधान होईपर्यंत चांदीचे बूट घालणार नसल्याची घोषणा त्यांनी केली आहे. अनवाणी राहतील. मनोज सिंग उर्फ मनोजानंद हे यूपीच्या कानपूरमध्ये गोल्डन बाबा म्हणून ओळखले जातात. तो त्याच्या स्टाईलमुळे चर्चेत असतो. सोमवारी त्यांनी मुख्यमंत्री योगी यांच्यासाठी शपथ घेतली. जोपर्यंत सीएम योगी पंतप्रधान होत नाहीत तोपर्यंत ते साडेचार किलो चांदीचे बूट घालणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. तो अनवाणीच राहील. तुम्हाला सांगतो की गोल्डन बाबा मनोज सिंग उर्फ मनोजानंद हे नेहमीच त्यांच्या व्हिडिओ आणि सोन्याच्या दागिन्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी पंतप्रधान होईपर्यंत चांदीचे बूट घालणार नसल्याची घोषणा त्यांनी केली आहे. अनवाणी राहतील. मनोज सिंग यांच्या चांदीच्या शूजचे वजन 4.5 किलो होते, त्यांनी ...

ज्यांचा जन्म १९७०, १९७१, १९७२, १९७३, १९७४, १९७५, १९७६, १९७७, १९७८, १९७९, १९८०, १९८१, १९८२, १९८३, १९८४, १९८५ ते १९९५ साली झाला आहे खास त्या पिढी साठी हा लेख

Image
ज्यांचा जन्म १९७०, १९७१, १९७२, १९७३, १९७४, १९७५, १९७६, १९७७, १९७८, १९७९, १९८०, १९८१, १९८२, १९८३, १९८४, १९८५ ते १९९५ साली झाला आहे खास त्या पिढी साठी हा लेख ही पीढ़ी आता 35 ओलाडून 50 कडे चाललीय, 'हया' आपल्या पिढीचं सगळ्यात मोठं यश म्हणजे या पिढीने खूप मोठा बदल पहिला आणि पचवला. आणि या पिढीची एक मोठी अडचण म्हणजे हि पिढी कायम उंबरठ्यावर राहिली..... १,२,५,१०,२०,२५,५० पैसे बघीतलेली ही पीढीत पाहुणे कडून लाज न बाळगता पैसे घेत होती. शाई-बोरु/ पेन्सिल / पेन पासून सुरवात करून, ही पीढी आता, स्मार्ट फोन, लॕप्टाॕप, पीसी, उतारवयात सराईतपणे हाताळत आहे*. ज्या पिढीच्या बालपणी सायकल सुद्धा एक चैन, असलेली, पण आता ह्या उतारवयात सराईतपणे स्कूटर, कार चालवणारी ही पिढी, अवखळ तर कधी गंभीर.... खूप भोगलेली आणि खूप सोसलेली, पण पूर्ण संस्कारित.... *टेप रेकॉर्डर, पॉकेट ट्रान्झिस्स्टर* ज्या पिढीसाठी खूप मोठी मिळकत होती.  *मार्कशीट* आणि *टिव्ही* च्या येण्यानी यांच्या बालपणाचा बळी घेतला नाही अशी ही शेवटची पिढी.  कुकरच्या रिंग्स, टायर, असल्या गोष्टी घेऊन लहानपणी *गाडी गाडी खेळणं* यात त्यांना काहीही ...

भारताच्या झपाट्याने वाढणाऱ्या को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड मार्केटमध्ये लवकरच एक नवीन प्रवेशिका दिसू शकते: देशातील सर्वात मौल्यवान फर्म.

Image
भारताच्या झपाट्याने वाढणाऱ्या को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड मार्केटमध्ये लवकरच एक नवीन प्रवेशिका दिसू शकते: देशातील सर्वात मौल्यवान फर्म. TechCrunch द्वारे पुनरावलोकन केलेल्या दस्तऐवजांनुसार, रिलायन्स स्वदेशी RuPay नेटवर्कवर दोन को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यासाठी राज्य-समर्थित कर्जदार SBI सोबत काम करत आहे. रिलायन्स एसबीआय कार्ड नावाची कार्डे रिलायन्स रिटेलसाठी व्हाउचर (समूहाची किरकोळ साखळी) आणि ट्रेंड्स, अजिओ, जिओमार्ट आणि अर्बन लॅडरसह इतर रिलायन्स मालमत्तांवरील खर्चावरील सवलत यासारखे काही "विशेष" फायदे ऑफर करतील. कागदपत्रे. SBI ने एका वेब पेजवर कार्डच्या अस्तित्वाची थोडक्यात पुष्टी केली जी त्यांनी काढून टाकली आहे. क्रेडिट कार्ड व्यवसायात रिलायन्सची स्वारस्य अशा वेळी येते जेव्हा जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस, रिलायन्स-समर्थित फायनान्स युनिटने कर्ज देणे आणि विमा व्यवसाय सुरू केला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला आपल्या वार्षिक अहवालात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने डेबिट कार्ड लॉन्च करण्याची योजना असल्याचे सांगितले. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्री...

*साबळेचा सापळा*स्टंटमॅन साईड हिरोचा डायरेक्टर कोण ?*क्रॉसलाईन*

Image
*साबळेचा सापळा* स्टंटमॅन साईड हिरोचा डायरेक्टर कोण ? *क्रॉसलाईन* दैनिक लोकाशा  आरक्षणाचे आंदोलन त्या गुणरत्नेच्या भोवती घोंगावे अशी कुणाची तरी इच्छा नक्की आहे , मुळात जे काही चालले आहे ते आरक्षणासाठी का हिरोगिरी साठी आहे हे कुणीतरी समजावून सांगितले पाहिजे , ओबीसी मधून आरक्षण आणि सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेले ५० टक्केच्या अधिकचे आरक्षण , या मुद्द्याचा आणि वर्तमान आंदोलन मार्गाचा मेळ जुळत नाही , जे काही दिसते दाखवले जात आहे ते केवळ मराठ्यांना जातीवादी हिंसक भासवून ओबीसी समुदायात भयाची निर्माणमशागत चालू आहे , पैसे उधळणारा मंगेश साबळे पंचायत समिती समोर निरागस वाटला , मात्र मागास आहोत म्हणून आरक्षण मागणाऱ्या आंदोलनात चार चाकी जाळणाऱ्या साबळेची कीव येते , स्टट करून वेगळेपण सिद्ध होईल मात्र त्यातून मागण्या पदरात पडतात असे नाही . मराठा आरक्षण आंदोलनात अनेकांनी आपआपले गेन घ्यायला सुरवात केली आहे , जरांगे हे निरागस असले तरी त्यांच्या आंदोलनात भाजप जसे लोणी काढत आहे तसे आता अनेकांनी या तापलेल्या तव्यावर आपल्या पोळ्या शेकायला सुरवात केली आहे , त्यातलाच एक मंगेश साबळे . मनोज जरां...

रात्रीचे साडेदहा वाजले आळंदी मधून घरी जात असताना

Image
रात्रीचे साडेदहा वाजले आळंदी मधून घरी जात असताना एका पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी मी थांबलो होतो.  पेट्रोल पंपाच्या पुढे एका मंडळाच्या नवरात्रीच्या कार्यक्रमात तरुण तरुणी हिंदी गाण्यावर नृत्य करत होते आणि एकीकडे या भगिनी आपल घर-कुटुंब चालवण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील छोट्या खेड्यातून येवून..संघर्ष करत..रणरागिणी सारखे हिमतीने पेट्रोल पंपावर काम करत आहेत. मला वाटलं मला साक्षात देवीचे दर्शन झाले आहे. त्यांच्या परवानगीने त्यांचा फोटो घेतला आणि पुढे निघालो. जिद्द, परिश्रम आणि चिकाटीने आपल्या कुटुंबासाठी कष्ट घेणाऱ्या सर्व माता-भगिनींना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. चांगल्या गोष्टी शेअर कराव्यात.🙏

#दुर्दैवहिरो सारखा सुंदर दिसणारा मुलगा

Image
#दुर्दैव हिरो सारखा सुंदर दिसणारा मुलगा जो बेंगलोरच्या नामांकित विद्यापीठात M.Tech चे उच्च शिक्षण घेत होता, अजून चार महिन्यांनी तो मोठ्या नोकरीवर रुजू होणार होता. पुढील वर्षात त्याने परदेशातही नोकरीस जाण्याची तयारी सुरु केली होती. ज्याची आई त्याच्या लग्नाची स्वप्न रंगवत होती. पोरगा हाताखाली आल्याचा बापाला अभिमान वाटत होता. सगळं अतिशय सुखा, समाधानात सुरु होते.  आणि मग अचानक २२ सप्टेंबरच्या रात्री वडिलांना बेंगलोर वरून त्यांच्या मुलाच्या मित्राचा फोन येतो की “तुमच्या मुलाचा अक्सिडेंट झालाय, डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तुम्ही तातडीने निघा” अंगावर अचानक वीज कोसळावी अशी ही दुर्देवी बातमी त्या बापाने कशी झेलली असेल ? बापाला बेंगलोरला पोहोचायला दुसऱ्या दिवशीची दुपार होणार होती. एवढ्या लांबच्या प्रवासात त्याची काय मानसिकता असेल. अपघात झाल्यानंतर त्या मुलाच्या मित्रांनी त्याला तातडीने हॉस्पिटलमधे दाखल केले. वडिल प्रवासात असतानाच मित्रांचा दुसरा फोनयेतो की “डॉक्टर म्हणालेत, मेंदूचे ऑपरेशन करावे लागेल, पण ते करूनही पेशंटचा फक्त एक टक्का चान्स असेल जगण्याचा” काय निर्णय घेतला अस...

"ताई कितीला दिला हा फडा?"" भाऊ हा ५० आणि हा ६० रुपायाला"

Image
"ताई कितीला दिला हा फडा?" " भाऊ हा ५० आणि हा ६० रुपायाला" त्यांनी उत्तर दिल्यानंतर मी परत प्रश्न केला  "दोन्ही तर सारखेच दिसताहेत फरक काय ?"  " भाऊ पानोळ्या,वजन सारखेच आहे फरक फक्त बांधण्यात असतो.दोरी गच्च कमी अधीक होते भाऊ म्हणून"  मी दोनही फडे हातात घेवून बघत होतो.अगदी दोनही बाजूने. त्या मायमाऊलीचे हृदय खालीवर होत होते.एखाद्याने मोठ्या श्रमाने हताला घाव सहन करुन एखादी सुंदर कलाकृती बनवावी आणि माझ्या सारख्याने क्षणात तिच्या उनीवा काढुन नावे ठेवून निघून जावे काय वाटत असेल त्या पोटासाठी रस्त्याच्या कडेला बसलेल्या जीवाला.  रस्त्यावर संपूर्ण अंधार झालेला आहे. आणि तिला एवढा माल खपवून घरी जायचेय.फक्त दोनच फडे उरलेले आहेत.आणि ते ही मी बघत आहे.  " भाऊ दहाविस कमी द्या,एवढे काय पहायले"  "अहो ताई मी किंमत कमी करनार नाही "  त्या रखुमाईला वाटले, मी किंमत करनार नाही म्हणजे आता मी निघून जातो का काय की.शेवटचा उरला सुरला माल असल्याने कदाचित मी घेनार नाही असा तिचा समज.  परत ती म्हणाली "भाऊ मया स्वता हताने बनवलेले फडे हाइत.एक भ...

जयभवानी ऊसाला २७०० रू पेक्षा जास्तीचा भाव देईल - अमरसिंह पंडित==========जय भवानीचा बॉयलर प्रदीपन समारंभ संपन्न============================

Image
जयभवानी ऊसाला २७०० रू पेक्षा जास्तीचा भाव देईल - अमरसिंह पंडित ========== जय भवानीचा बॉयलर प्रदीपन समारंभ संपन्न ============================ गेवराई दि. १६ (प्रतिनिधी) चालू हंगामात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे आपल्याला अडचणीला सामोरे जावे लागणार आहे, कर्जाचे व्याजही आधीक दराने द्यावे लागणार आहे, अशा प्रतिकुल परिस्थितीत योग्य नियोजन करुन आपण गळीत हंगाम सुरु करत आहोत. अडचणीचा काळ असला तरी जय भवानी ऊसाला जास्तीत जास्त भाव देण्याचे नियोजन करणार आहे, या हंगामात ऊसाला प्रती टन २७००/- रुपयाच्या पुढेच भाव असेल असा विश्वास जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी केले. कारखान्याच्या ४१ व्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभात ते बोलत होते. जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या ४१ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ सोमवार दि.१६ ऑक्टोबर रोजी श्री क्षेत्र चाकरवाडी संस्थानचे महंत ह.भ. प. महादेव महाराज यांच्या शुभहस्ते आणि कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव दादा पंडित, चेअरमन अमरसिंह पंडित, माजी चेअरमन जयसिंग पंडित, यांच्यासह सर्व संचालक मंडळाच्या उपस्थित संपन्न झाला. ...