Posts

Showing posts from October 5, 2023

*हुशार हो रं मराठ्या....*कमळाच्या बागेसाठी चिखल तुडवला जातोय .

Image
*हुशार हो रं मराठ्या....* कमळाच्या बागेसाठी चिखल तुडवला जातोय . उपोषण सोडले तरी जागा सोडणार नाही म्हणणारे जरांगे तालुकानिहाय मराठवाड्यात प्रचंड गर्दीच्या समोर दिसत आहेत , मुळात गर्दी मुळे सरकारवरचा दबाव वाढवला जातोय कि सरकारला सुरक्षित केले जातेय सहज समजणारा पेच आहे . शिंदेच्या हातानेच पाणी पिणारे जरांगे आता शिंदेची ढाल बनलेच आहेत , मुळात मराठ्यांची गर्दी महाराष्ट्राला नवी नाही , कुठल्याही नेत्या शिवाय लाखोंचे मोर्चे निघाले ते काही कुठल्या नेत्याच्या मागे नाही तर पोटाच्या गोळ्यासाठी , मात्र त्यातून त्या गरिबांना भेटले काय , मराठ्यांच्या गर्दीत आरक्षणाचे रक्षण झाले नाही मात्र त्या गर्दीच्या सूर्यफुलात क्रांतीसूर्य 'फुलले' उगले आणि मोठे झाले . जरांगे यांच्या समोरची गर्दी लेकरांच्या भविष्यासाठी आलीय , आजवर अनेकांच्या समोर येऊन बसली मात्र त्यांचा प्रश्न तसाच राहिला , याचा अर्थ गर्दीच्या समोर भाषन करणाराने त्यांना फसवले असे नाही , मुळात आरक्षण मिळण्याची मिळवण्याची रीत दिशा योग्य नसल्याने दशा झाली असेच निरक्षण आहे , गर्दी आणि तर्क यातला फरक उद्याची फसवणूक ठरत आलेली आहे ...