▪️अखेर बीड बायपासवर उड्डाणपुल, सर्व्हिस रोडच्या निघाल्या निविदा▪️केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी बीडकरांना दिलेला शब्द पाळला.
▪️अखेर बीड बायपासवर उड्डाणपुल, सर्व्हिस रोडच्या निघाल्या निविदा ▪️केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी बीडकरांना दिलेला शब्द पाळला. ▪️मा.नितीनजी गडकरी साहेबांचे मनःपूर्वक आभार. ▪️सोलापूर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर बीड शहरालगतच्या स्लीप रोडसह महालक्ष्मी चौकात उड्डाणपुल बांधण्यासंदर्भातील तांत्रिक शक्यता तपासण्याचे निर्देश केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने दि.२७ जून २०२४ रोजी दिले होते. ही कार्यवाही पूर्ण करून बहुप्रतिक्षित असलेल्या बीड बायपासवरील उड्डाणपुलांसह सर्व्हिस रोडच्या निविदा विभागाने काढल्या आहेत. या कामाबद्दल लोकसभा निवडणुकीत माजलगावच्या जाहीर सभेतून केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांनी बीडकारांना दिलेला शब्द पाळत वर्षभराच्या आता कामांच्या निविदा काढल्या आहेत. याबद्दल ना.नितीनजी गडकरी साहेबांसह शिफारस करणाऱ्या नेत्यांचे आभार मानले आहेत. भुपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडे प्रस्ताव दिला होता. यात महालक्ष्मी चौकातील उड्डाणपुलासोबतच तेलगाव आणि पिंपळनेर रस्त्यावरील स्लिप रोडची देखील मागणी करण्यात आली होती. या पत्रांचा संदर्भ देत ना.नितीनजी गडकरी यांच्या आदेशावरून...