Posts

Showing posts from August 5, 2023

भाजपमध्ये प्रवेशासाठी लोकांची लांबच लांब रांगा; पण फडणवीसांच्या हाऊसफुल्लचा बोर्ड; मुनगंटीवार यांचे मोठे वक्तव्य.

Image
भाजपमध्ये प्रवेशासाठी लोकांची लांबच लांब रांगा; पण फडणवीसांच्या हाऊसफुल्लचा बोर्ड; मुनगंटीवार यांचे मोठे वक्तव्य. पुणे :- शिवसेनेत सुरुवातीला मोठी फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. एका वर्षानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. तेही सरकारमध्ये सामील झाले. यानंतर काँग्रेस नेतेही भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची मोठी रांग आहे. काँग्रेसचे काही नेते आमच्या संपर्कात आहेत. पण आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी हाऊसफुल्लचा फलक लावला आहे. आम्ही काँग्रेसच्या अनेक नेत्यांशी बोललो आहोत. काँग्रेस नेते अधूनमधून भेटतात. मी शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस पक्ष सोडणार नाही, असे सांगण्याची हिंमत कोणत्याही काँग्रेस नेत्याने दाखवावी, असे खुले आव्हान मुनगंटीवार यांनी दिले. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अद्यापही रखडला आहे. यावर त्यांनी प्रतिक्रिया ...