Bihar Train Mishap : बिहारच्या बक्सरमध्ये नॉर्थ इस्ट एक्स्प्रेसचे २० डबे रुळावरुन घसरले, चार जणांचा मृत्यू तर ८० हून अधिक प्रवासी जखमी
Bihar Train Mishap : बिहारच्या बक्सरमध्ये नॉर्थ इस्ट एक्स्प्रेसचे २० डबे रुळावरुन घसरले, चार जणांचा मृत्यू तर ८० हून अधिक प्रवासी जखमी Buxar Bihar Train Mishap: रात्री ९.३५ च्या दरम्यान ही घटना घडली, अनेक प्रवाशांना काय घडतंय ते कळलंही नाही आणि काही सेकंदात अपघात झाला Bihar Train Mishap Today: बिहारमधल्या बक्सर भागात नॉर्थ इस्ट एक्स्प्रेस रुळावरुन घसरल्याने अपघात झाला. टूरीगंजे ते रघुनाथपूर दरम्यान हा अपघात झाला. या ठिकाणी आता मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला, ८० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना पाटणा येथील आयजीआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही ट्रेन दिल्लीहून कामाख्या या ठिकाणी चालली होती. या ट्रेनचे २० डबे रुळावरुन घसरले आहेत. ज्या ठिकाणी रेल्वेचे डबे घसरले तिथे मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. NDRF, SDRF, जिल्हा प्रशासन, रेल्वे अधिकारी यांच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. २३ डब्यांची ही ट्रेन सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी दिल्लीतल्या आनंद विहार ट...