Posts

Showing posts with the label Shetkari

पाखऱ्याची आठवण ....!

Image
पाखऱ्याची आठवण मगाशी रोहित ने हा फोटो पोष्ट केला अगदी खरच गलबलून आले, हो खरच . पाखऱ्या आणि गुण्या अशी जोड आमच्याकडे होती , पोळा केवळ एक दिवसाचा सण नसायचा , पंधरा दिवस सूत कातला जायचे , मुंगसे वेसनी झुकी याची लगबग असायची . म्हणून ज्याला आम्ही बैल म्हणतो ना तो ते केवळ पशु नसायचा घरातला एक सदस्य असायचा . पाखऱ्या ला वैरण टाक , पाखऱ्याला पाणी दाखवलं का , या थोरल्या वाक्यात काळजी असायची . खांदा मळणी ला बैल पोहनी लावायची एक लकब असायची आणि त्या निमित्ताने घरातल्याच्या मान्यतेने पोहण्याची आम्हाला ही संधी . सगळं अगदी निरागस आणि श्रद्धेने असायचे बैलांना कसला पोळा कळतो मात्र शेतकरी या एका दिवशी वर्षाचे त्याचे ऋण व्यक्त करायचा . वेशीतून पहिले बैल ज्याचे निघायचे त्याचा मोठा मान असायचा . दिवसभर आसरा मसुबा माळावरचा दर्यातला असे सगळे देव आणि मारुतीला सवते नारळ फोडली जायची . सगळी नारळ फोडायला घरच्या एका विशेष व्यक्तीची नेमणूक असायची कारण सगळे देव म्हणजे गावचा अर्धा शिवार पायदळी तुडवायचा तो ही चिखलात , म्हणजे पोळा आणि पाऊस म्हणजे ठरलेली गोष्ट . मग वायरची पिशवी नारळाच्या तुकड्याने फुल भरायची...

अन्नदात्याचा सखा आणि बैलपोळा .

Image
अन्नदात्याचा सखा आणि बैलपोळा मानवाच्या उत्क्रांतीस आरंभ झाल्यानंतर लागतलेला अग्नीचा शोध जितका महत्वाचा होता त्याही पेक्षा अधिक महत्वाचा शोध हा चाकाचा शोध होता. आदीम काळात जंगलामधून राहणाऱ्या मानव प्राण्याला कित्येक शतके भटक्या टोळया घेऊन रहावे लागले मात्र चाकाचा हा शोध त्याचं आयुष्य स्थिरावणारा ठरला... त्याच सुमारास बैलांच्या सहाय्याने शेतीचे तंत्र मानवाला उमगले आणि त्यानंतर संपन्न अशा संस्कृतीचा जगात वेग वेगळया ठिकाणी उगम झाला.  आज यंत्रांच्या सहाय्याने शेतीचे तंत्र गवसले असले तरी शतकानुशतके बैलांच्या सहाय्याने शेती होत आली असल्याने त्यांच्या असणाऱ्याला एक आगळे महत्व आहे. सण - उत्सवी परंपरांच्या आपला भारत देशात आजही ग्रामीण बाज कायम आहे. त्यामुळे श्रावणी आमावस्येला साजरा होणारा बैलपोळा सण या परंपरेतील एक महत्वाचा सण ठरतो.  आपल्या आयुष्यात अन्नधान्य पिकविण्यात ज्याची मदत होत असते त्या बैलाबाबत कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण महाराष्ट्राची खास ओळख बनलेला आहे.  बैलासाठी हा पुर्ण विश्रांतीचा दिवस पोळयाच्या आदल्या दिवशी बैलाला आवतन देण्याची परंपरा आहे. त्यानंतर बैलां...