सलाम त्या कर्तुत्वाला 🙏
पुन्हा शून्य लोकाशा ची शिदोरी आयुष्यभर पुरल नाळवंडी सारख्या लहान गावातला भागवत महाराष्ट्राचा लोकपत्रकार भागवत तावरे केला तो लोकाशाने . मला प्रसिद्धी सायत्ता दिली संपादक विजयराज बंब साहेबानी मला मुलासारखे जपले लेखणी बहाल केली. 1300 क्रॉस लाईन लिहून शेकडो विषय हातावर घेतले ज्यावर चर्चा झाल्या वाद झाले सवांद झाले मात्र संपादक साहेबानी मला रोखले नाही माझे अनेक वार त्यांनी झेलत मला सुरक्षित केले .याच काळात मला महाराष्ट्र पातळीवर 109 पुरस्कार भेटले , मी याच काळात शेकडो कार्यक्रमात वक्ता म्हणून उपस्थित राहिलो , याच लोकशाच्या पानातून विस्थापित पोरांना मांडू शकलो अन जिल्ह्यात एक सदर आणि साखळी उभा करू शकलो . मी जगात कुठे ही असो माझा जीव लोकाशात असायचा . माझ्या काम करण्याच्या टेबल वर विठलं रखुमाई व बुद्धाचा पिंपळ गाथा ज्ञानेश्वरी कुराण पुराण असायची मी माझी अधिकृत सुट्टी कधीच घेतली नाही . अनेक जण म्हणायचे सुट्टी दिवशी तरी ऑफिस का , माझं मन लागायच नाही माझ्यातला लेखक कधीच स्वस्थ बसायचा नाही . अवती भवती खटकले काही की विषय वाजलाच म्हणून समजा . क्रॉसलाईन हे सदर महाराष्ट्राच्या मुख्यमं...