तोंडातला घास तोंडातच राहिला आणि डोळ्यातून अश्रूचे ओघळ वाहू लागले.
तोंडातला घास तोंडातच राहिला आणि डोळ्यातून अश्रूचे ओघळ वाहू लागले. नवीनच लग्न झालेला बंटी, जेवणाचा पहिल्या घास गिळता गिळताच रडू लागला. पण पंचाईत बिचाऱ्या बंटीच्या बायकोची झाली. अंगाने सडपातळ, उंचीने थोडी छोटी, गहू वर्ण, लांबसडक केस असणारी, काळेभोर आणि बोलक्या डोळ्याची मीना पुरती गोंधळली, मीना आणि बंटीच लग्न होऊन ४ दिवस झाले होते. बंटीचा स्वभाव तिच्यासाठी नवीन होता. पूजा आणि देव देव कालच पार पडले होते. सगळे पाहुणे आपापल्या घरी गेले होते. त्यामुळे आज घरात बंटी आणि मीना दोघेच होते. पण बंटीच्या पानावलेल्या डोळ्यांमुळे मीनाला प्रश्न पडला. तीच काही चुकलं असेल का? तिने गोंधळलेल्या आवाजात, गालावर येणारी बट डाव्या हाताने कानामागे सारत, विचारलं "काय हो काय झालं? भाजी तिखट आहे का? डोळ्यात पाणी का तुमच्या?" तसे बंटीने स्मित हास्य केलं. आणि मीना अजूनच गोंधळली. तिने बंटीच्या बाजूला बसता बसता विचारलं "मग काय झाल? डोळ्यात पाणी का?" बंटी पाणावलेले डोळे पुसत, नजर चोरत म्हणाला "कुठे रडतोय, काहीच नाही" तशी मीना म्हणाली "अहो आपलं नवीन लग्न झाल असल, तरी माझ्या येत लक्षा...