Posts

Showing posts from October 26, 2023

*साबळेचा सापळा*स्टंटमॅन साईड हिरोचा डायरेक्टर कोण ?*क्रॉसलाईन*

Image
*साबळेचा सापळा* स्टंटमॅन साईड हिरोचा डायरेक्टर कोण ? *क्रॉसलाईन* दैनिक लोकाशा  आरक्षणाचे आंदोलन त्या गुणरत्नेच्या भोवती घोंगावे अशी कुणाची तरी इच्छा नक्की आहे , मुळात जे काही चालले आहे ते आरक्षणासाठी का हिरोगिरी साठी आहे हे कुणीतरी समजावून सांगितले पाहिजे , ओबीसी मधून आरक्षण आणि सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेले ५० टक्केच्या अधिकचे आरक्षण , या मुद्द्याचा आणि वर्तमान आंदोलन मार्गाचा मेळ जुळत नाही , जे काही दिसते दाखवले जात आहे ते केवळ मराठ्यांना जातीवादी हिंसक भासवून ओबीसी समुदायात भयाची निर्माणमशागत चालू आहे , पैसे उधळणारा मंगेश साबळे पंचायत समिती समोर निरागस वाटला , मात्र मागास आहोत म्हणून आरक्षण मागणाऱ्या आंदोलनात चार चाकी जाळणाऱ्या साबळेची कीव येते , स्टट करून वेगळेपण सिद्ध होईल मात्र त्यातून मागण्या पदरात पडतात असे नाही . मराठा आरक्षण आंदोलनात अनेकांनी आपआपले गेन घ्यायला सुरवात केली आहे , जरांगे हे निरागस असले तरी त्यांच्या आंदोलनात भाजप जसे लोणी काढत आहे तसे आता अनेकांनी या तापलेल्या तव्यावर आपल्या पोळ्या शेकायला सुरवात केली आहे , त्यातलाच एक मंगेश साबळे . मनोज जरां...