Ipl 2025 : मुंबईची पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप, टॉप 5 मध्ये मोठा बदल, 3 संघांना झटका.
Ipl 2025 : मुंबईची पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप, टॉप 5 मध्ये मोठा बदल, 3 संघांना झटका IPL 2025 Points Table MI vs LSG : मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियममध्ये लखनौ सुपर जायंट्सचा धुव्वा उडवत मागील पराभवाचा हिशोब क्लिअर केला. तसेच मुंबईच्या या विजयामुळे पॉइंट्स टेबलमधील चित्र पूर्णपणे बदललं. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने 18 व्या मोसमात विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. मुंबईने रविवारी 27 एप्रिलला वानखेडे स्टेडियममध्ये लखनौ सुपर जायंट्सचा धुव्वा उडवत सलग पाचवा तर एकूण सहावा विजय मिळवला. मुंबईने 216 धावांचा पाठलाग करणाऱ्या लखनौला 161 वर ऑलआऊट केलं. मुंबईने अशाप्रकारे 54 धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला. मुंबईला या विजयानंतर तगडा फायदा झाला आहे. मुंबईने पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतल्याने टॉप 5 मधील संपूर्ण चित्रच बदललं आहे. मुंबईने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये 3 स्थानांची मॅरेथॉन झेप घेतली आहे. मुंबई लखनौ विरूद्धच्या सामन्याआधी पाचव्या स्थानी होती. मात्र विजयानंतर मुंबईने थेट दुसर्या क्रमांकावर उडी घेतली. मुंबईच्या या विजयामुळे दिल्ली...