चक्क वाघासोबत मजा ? पाहा तरूणीने धोकादायक प्राण्याशी काय केले व्हिडिओ.
चक्क वाघासोबत मजा ? पाहा तरूणीने धोकादायक प्राण्याशी काय केले Video नवी दिल्ली, 06 जून : जंगलातील धोकादायक प्राण्यांच्या हालचाली आता मानवी वस्तीतही पाहायला मिळत आहेत. दिवसेंदिवस मानवी वस्तीत येणाऱ्या प्राण्यांची संख्या वाढत आहे. यासोबतच जंगल सफारीसाठी उद्यानात जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. बरेच लोक प्राणी पाहण्यासाठी, त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी उत्सुक असतात. पण प्राण्यांसोबत मजा करणे ही अनेकदा महागात पडते. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे ज्यात एका तरुणीची वाघासोबतची मस्ती तिला महागात पडली आहे. याचा व्हिडिओही समोर आला आहे. एका तरुणीने वाघाला मिठी मारली. तिच्यासोबत मस्ती करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. पण हळुहळु वाघाने तिचा हात आणि पाय जबड्यात पकडायला सुरुवात केली. तिघांनी अनेकवेळा त्याला दूर लोटण्याचा प्रयत्न केला पण त्याने तिचे शरीर आपल्या जबड्यात धरले. हा व्हिडिओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे व्हायरल व्हिडिओमध्ये एक मुलगी बसलेल्या वाघाशी खेळताना दिसत आहे. ही तरुणी त्या धोकादायक प्राण्यासोबत मस्ती करताना दिसली ज्यामुळे तिला भीतीने घाम फुटला. तरुणी डोक्यावर हात ...