आज पर्यंत तुम्ही मला धनंजय पंडीतराव मुंडे या नावाने ओळखता,
नमस्कार! आज पर्यंत तुम्ही मला धनंजय पंडीतराव मुंडे या नावाने ओळखता, आज पासून माझ्या आईचे नाव माझ्या वडिलांच्या नावा अगोदर लावून शासकीय कामकाजामध्ये माझे नाव 'धनंजय रुक्मिणी पंडीतराव मुंडे' असे असेल. आज या नावाची पाटी माझ्या मंत्रालयातील दालनात लावली आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार व माझ्या भगिनी तथा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कु. आदितीताई तटकरे यांनी नव्याने राज्याचे चौथे महिला धोरण घोषित केले. त्यानुसार मी माझ्या नावात आज पासून बदल केला असून आजपासून शासकीय कामकाजात माझे नाव धनंजय रुक्मिणी पंडीतराव मुंडे असे असेल. या निर्णयाबद्दल माझी लहान बहीण आदितीताईचे मनःपूर्वक अभिनंदन! Aditi Tatkare NCPSpeaks_Official