रात्रीचे साडेदहा वाजले आळंदी मधून घरी जात असताना
रात्रीचे साडेदहा वाजले आळंदी मधून घरी जात असताना एका पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी मी थांबलो होतो. पेट्रोल पंपाच्या पुढे एका मंडळाच्या नवरात्रीच्या कार्यक्रमात तरुण तरुणी हिंदी गाण्यावर नृत्य करत होते आणि एकीकडे या भगिनी आपल घर-कुटुंब चालवण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील छोट्या खेड्यातून येवून..संघर्ष करत..रणरागिणी सारखे हिमतीने पेट्रोल पंपावर काम करत आहेत. मला वाटलं मला साक्षात देवीचे दर्शन झाले आहे. त्यांच्या परवानगीने त्यांचा फोटो घेतला आणि पुढे निघालो. जिद्द, परिश्रम आणि चिकाटीने आपल्या कुटुंबासाठी कष्ट घेणाऱ्या सर्व माता-भगिनींना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. चांगल्या गोष्टी शेअर कराव्यात.🙏