मानाची_टोपली#
मानाची_टोपली# "ताई, घ्या की व थोड्या मिरच्या..." "अहो आजी किती आग्रह तुमचा??? नको मला सांगितलं ना एकदा... सगळ्या लाल झाल्या आहेत बघा.. किती शिळ्या आहेत??? नको नको... तुम्ही जा बर आधी इथुन.." ती आजी काही ऐकायला तयार न्हवती.. "आव घ्या व.. लई उपकार व्हतील बघा तुमचं" मानवी तिला कंटाळून " बर द्या १० रुपयांच्या.." म्हातारी भलतीच सुखावली, तिने लगबगीने वजन केले आणि मानवीला ढोबळी मिरची दिली.. मानवीने १० रुपये तिच्या हातावर टेकवताच म्हातारीने ते कपाळाला लावले "दुध घेऊन जाता यील आता.." असं म्हणुन ती तिथुन निघून गेली.. पण मानवी मात्र विचारात पडली होती, "असं का बोलली असेल ही आजीबाई??? तिच्याकडे दुध घेण्यासाठी १० रुपये सुध्दा न्हवते???" दिवसभर तिचं चित्त थाऱ्यावर न्हवते... सतत तिचं गोष्ट तिच्या मनाला सलत होती... घरातल्या कामात आणि इतरही कशातच तिचं मन लागत न्हवते... रात्र झाली.. कुशीची अदला बदल सुरू होती.. पण झोप काही लागत न्हवती.. आजीबाई ने सोडलेला भुंगा तिचं काळीज पोखरून काढत होता.. विचारांच्या कलहात कधी पहाट झाली कळालच नाही....