धनगर व वडार समाजाला एस्. टी. आरक्षण लागू करण्यासाठी आमरण उपोषण
धनगर व वडार समाजाला एस्. टी. आरक्षण लागू करण्यासाठी आमरण उपोषण बीड : देशातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यात धनगर व वडार समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षणाची अंमलबजावणी करा त्यामुळे या दोन्ही समाजाच्या उन्नतीसाठी, प्रगती होईल म्हणून भाई आकाश निर्मळ यांनी धनगर व वडार समाजाला एस.टी. प्रवर्गातून आरक्षण लागू करा या मागणीसाठी त्यांनी लोकशाही मार्गाने उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे आजचा त्यांचा दुसरा दिवस आहे. उपोषणकर्ते भाई आकाश निर्मळ यांना पाठिंबा देण्यासाठी येणारा प्रत्येक जण आपली भावना व्यक्त करताना धनगर व वडार समाजाची फसवणूक करून मराठा ओबीसी वाद पेटविण्याच्या तयारीत असल्याचे सांगत आहेत धनगर व वडार समाजाची मुळ एस.टी आरक्षण आहे पण त्याची अंमलबजावणी आजपर्यंत सत्तेत आलेल्या सरकारने केली नाही. कारण देशातील ईतर राज्यात धनगर व वडार समाजाला एस.टी आरक्षण लागू आहे पण फक्त महाराष्ट्र राज्य सरकारच्या गलथान कारभारामुळे ते आजपर्यंत लागु झाले नाही. हे सर्व सोडून ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष करत फिरणारे स्वयंघोषित नेते समाज द्रोह करीत असल्याचे मत उपस्थितांकडून व्यक्त केले जात आ...