■■ *स्वतःला सांभाळूनच दुसर्याला यश* ■■
■■ *स्वतःला सांभाळूनच दुसर्याला यश* ■■ °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° कुकरची शिट्टी झाली, दाराची बेल वाजली चटकन उठायचं पटकन धावायचं झटकन वळायचं लगबग करायची हे माझ्या अंगातच. मुद्दाम नाही करत. आपोआपच होतं. आई तर म्हणायचीच ," अगं अगं आपटशील!" आणि खरोखरच घरातील कधीही न हालणार्या वर्षोनुवर्षं एकाच जागी स्थीर असणार्या भिंती कपाट अशांवर ही मी आदळायची. हळूहळू माझं वय वाढलं. ओरडायला आई पण राहिली नाही. एकदा मी बेडवर लोळत वाचत पडले होते. फोन ची रिंग वाजली. तेव्हा land line phone होते. मी ताडकन उठले फोन कडे धावले आणि गुढग्यातून कट्टकन आवाज झाला. एक पाऊल टाकता येईना. हे दुखणं पुढे मला सहा महिने पुरलं. घरात अडकले. हालचालींवर अनेक बंधनं आली. एका धसमुसळेपणा मुळे! ज्याची काहीच गरज नव्हती. मी हे सर्व संथपणे करु शकले असते. आपला job मुलं बाळं सांसारिक जबाबदाऱ्या धावपळीचं आयुष्य मल्टी टास्किंग ह्यामुळे आपल्या शरीराला काही सवयी आपोआप पडलेल्या असतात काही आपण प्रयत्नाने अंगी बाणवलेल्या असतात. वय वाढत गेल्यावर ह्यातल्या बऱ्याचशा जबाबदाऱ्या कमी झालेल्या असतात पण आपल्या सव...