साहेबांची खेळी:शरद पवार यांनी घेतली बदामराव पंडित यांची भेट; गेवराईच्या राजकारणात चर्चेला उधाण.
साहेबांची खेळी:शरद पवार यांनी घेतली बदामराव पंडित यांची भेट; गेवराईच्या राजकारणात चर्चेला उधाण. गेवराई मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस म्हटले की पंडित कुटुंब डोळ्यासमोर येत असते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली आणि पंडित कुटुंबातील अमरसिंह पंडित यांनी अजित पवार यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शवला. यानंतर आज पवारांनी बीडच्या सभेसाठी जात असताना गेवराईमध्ये माजी आमदार बदामराव पंडित यांची भेट घेतली. दरम्यान शरद पवारांनी बदामराव पंडित यांची भेट घेतल्याने गेवराईच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवारांची बदामराव पंडित यांच्या घरी भेट ही पुर्वनियोजित असल्याने पवारांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती. चर्चांना उधाण राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर तत्कालीन प्रदेशर सरचिटणीस, माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी अजित पवारांसोबत जाणे पसंत केले. त्यामुळे शिवाजीराव पंडित आणि शरद पवार यांच्या नात्यात दुरावा आला नसला तरी पवारांनी बदामरावांच्या घरी भेट देत सूचक संकेत दिल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता शरद पवारांनी पंडित कुटुंबियांची घेतलेली ही भ...