Posts

Showing posts with the label Ahmadnagar

'मराठी भाषा गौरव दिनाच्या' खूप खूप शुभेच्छा.

Image
सर्वप्रथम महाराष्ट्रात, देशांत आणि जगभरात पसरलेल्या तमाम मराठी जनांना 'मराठी भाषा गौरव दिनाच्या' खूप खूप शुभेच्छा. मराठीत बोलणं, ह्या भाषेत नवनवीन ज्ञान, विचार, कल्पना जन्माला घालणं आणि त्यातून आपल्या भाषेची ताकद, त्याचा पैस, ह्याची जगाला जाणीव करून देणं ह्यातून आपण एक प्रकारे मराठी भाषेचा गौरव करतोच आणि खरंतर अशाच पद्धतीने फक्त आजच नाही तर ३६५ दिवस साजरा व्हायला हवा.  मागे मी म्हणलं तसं की मराठी ज्ञानाची भाषा व्हायला हवी. पण हे होत असताना बदलत्या प्रवाहांचा विचार व्हायला हवा. आजची तरुण पिढी दिवसातील बहुसंख्य वेळ विविध समाज माध्यमांवर असते. त्यातले अगदी सगळे नाही पण बऱ्यापैकी तरुण-तरुणी हे सामान्य दर्जाचे रिल्स बघण्यात त्यांचा वेळ घालवत असतात.  पण ह्याच सगळ्यांना विज्ञान ते आर्थिक संकल्पना ते अनेक विषयांवरचं माहिती, ज्ञान मराठी भाषेत मिळालं तर ते नक्की बघतील. मला माहीत आहे की आज मराठीमध्ये युट्युबसाठी खूप दर्जेदार कन्टेन्ट तयार होत आहे पण त्याचं प्रमाण निश्चित कमी आहे. आज विविध क्षेत्रांत खूप उच्च पदांवर काम करणारी मराठी माणसं आहेत, त्यांचा त्यांच्या क्षेत्रातील...

*पोहोचलो रे , पेताडांनो*पुढच्या वर्षी लवकर येणार नाही , पत्र गणपतीचे *क्रॉसलाईन*

Image
*पोहोचलो रे , पेताडांनो* पुढच्या वर्षी लवकर येणार नाही , पत्र गणपतीचे *क्रॉसलाईन*      पार्वती मातेने मला झोडपून काढले , गण्या म्हणू म्हणू माझी टीर लाल केली . असेच पूर्वी कधीच झाले नव्हते , अंगावर गुलाल म्हणावा तर प्रत्येक वर्षी गुलाल असायचा , मग याच वर्षी असा प्रसाद का मला काही कळेना , म्हणे तुला मोदक खायला पाठवले होते का दारू प्यायला , मी म्हटलो नाही मी नाही पिलो तर तिने पितांबर अंगावर फेकून विचारले , वास घे . पितांबर नाकाला लावला आई शपथ . यावर्षी पत्ते खेळणारे भक्त चक्क दारूत माझ्या मिरवणुकीत होते , माझ्या लक्षात आले अरा अरा कहार येताना झालाय . माझ काही नाही मी तुम्हाला नेहमी एड्जस्ट करत आलोय रे , मात्र दारू म्हणजे जास्तच होतेय . लई हिंदू हिंदू करता , कुणी आपल्या देवाला दारू पिऊन भंजते का , इथे नाही का हिंदुत्व खतऱ्यात , काय दिवस होते राव ते , गणपती मेळे असायचे लोक जात धर्म विसरून जायचे आता मात्र जात निहाय गणपती असतात , साळी गल्लीचा गणपती , कोळी गल्लीचा राजा , लालबाग चा राजा , सगळ तुमच्या साठी असते माझ्या साठी काही नसते . ज्या लेकरांना समज यायची म्हणजे १० व...