अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव येथील
◆ आदर्श घ्यावा असे काही... हे वाचताना डोळ्यातून आसवं ओघळणारच.. आमच्या अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव येथील "भुसारे" परिवारातील दोन मुलींच्या लग्नात मामाचे विधी बाबा भाई पठाण यांच्या हस्ते संपन्न झाले. त्या मुलींची आई दरवर्षी "बाबाभाई" ना राखी बांधते कारण तिला सख्खा भाऊ नाही. भावाची व मामाची भुमिका "बाबाभाई" पठाण यांनी बजावली. सामाजिक ऐक्याचा एक डोंगराएव्हढा आदर्श उभा केला... सलाम ह्या नात्याला !! - देवा झिंजाड सुभेदार पोस्ट जुनीच आहे परंतु सामाजिक ऐक्यासाठी फार प्रेरणादायक आहे म्हणून आपणास शेअर केले