*`जुन्या आठवणीॅना उजाळा.....*
■■ *`जुन्या आठवणीॅना उजाळा.....* ■■ °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° पेन मध्ये *शाई भरून घेण्यासाठी दुकानदाराच्या समोर रांग लावलेली आमची पिढी*..... दुकानदार ही शाईचे थेंब मोजुन पेन मध्ये टाकायचा. आधीच होल्डर उघडून ठेवायचे आणि रांगेत उभे रहायचे. *कधी शाई हातावर सांडायची, ती तशीच डोक्याला पुसायची*. *कधी शर्ट खराब व्हायचा, तर कधी चड्डी*.... *या रांगेतूनच आमच्या पिढीला सहनशील बनवलं*. तो शाई मिळाल्याचा आंनद भारीच होता. *शाळेत तर काही बोलायची सोयच नव्हती.* *कान धर*, *कोंबडा हो*, *बेंचवर उभे रहा*, *अंगठे धर*, *वर्गाबाहेर उभे रहा*, अशा *सगळ्या शिक्षा निमुटपणे हसत-खेळत सहन केल्या*.... शिक्षकांच्या *सपासप छड्या खाल्ल्या*. *यातुनही सहनशीलता वाढली*. पण *त्या शिक्षणाची गोडीपण न्यारीच होती.* *जुन्या कपड्यांची शिऊन घेतलेली दप्तरे वापरलेली आमची पिढी*... दप्तरे म्हणजे तरी काय, तर कापडाची पिशवी. *फार तर काय त्यालाच आतुन कम्पास ठेवण्यासाठी केलेला कप्पा*... असं दप्तर आता पुन्हा भेटणे नाही, *शाळेतू...