Maharashtra Rainstorm : राज्यावर पुढचे ३-४ अस्मानी संकट, मुंबई, पुण्यासह ७ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Rainstorm : राज्यावर पुढचे ३-४ अस्मानी संकट, मुंबई, पुण्यासह ७ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा Maharashtra Weather conditions Estimate : राज्यात मान्सूनने एन्ट्री घेतल्यापासून धुवांधार पाऊस सुरू आहे. अशात हवामान खात्याकडून राज्यात पुढच्या ३-४ तासांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून मुंबई, पुण्यासह तब्बल ७ जिल्ह्यांना वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई : मान्सूनने यंदा उशिरा हजेरी लावली असली तरी सुरुवातीच्या हंगामातच तुफान पाऊस सुरू आहे. गेल्या ३ दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र मान्सून दाखल झाला असून आज आणि उद्या हवामान खात्याकडून राज्याला ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरांत, रायगड, पुणे, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात यामुळे जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशात राज्यासाठी पुढचे ३-४ तास महत्त्वाचे आहेत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ३-४ तासांत मुंबई जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ठाणे आणि नाशिक, पुणे, साता...