Posts

Showing posts with the label Live News

कोणतंही कार्य असल्यावर सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते. कारण गणपती विघ्नहर्ता आहे.

Image
2022 मध्ये गणेश चतुर्थी 31 ऑगस्ट ला आहे. संपूर्ण भारतात आणि विदेशातही लोक आपापल्या परंपरेनुसार दीड दिवस ते अगदी 11 दिवसापर्यंत गणपतीची माहिती (ganpati information in marathi) घेऊन त्याची स्थापना करून गणेशोत्सव साजरा करतात. भगवान शंकर आणि पार्वती पुत्र गणपती हे बुद्धीची देवता आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आद्य देवता गणपतीची स्थापना करून पूजा केली जाते. तसंच हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला प्रथम पूजेचा मान आहे. कोणतंही कार्य असल्यावर सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते. कारण गणपती विघ्नहर्ता आहे. गणपतीची अनेक नावं आहेत त्यापैकीच हे एक नाव. विघ्नहर्ता अर्थात संकटाचं हरण करणारा असं आहे. म्हणून प्रत्येक शुभ कार्याच्या वेळी सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते. तसंच गणेशोत्सवाचा पहिला दिवस असतो गणेश चतुर्थीचा (information about ganesh chaturthi in marathi). या दिवशीच प्रारंभ होतो गणेशोत्सवाला. गणेशाच्या आगमनाने सगळीकडेच भक्तीमय वातावरण दिसून येते.  गणेश चतुर्थी संपूर्ण कथा (Ganesh Chaturthi History In Marathi) हिंदू कॅलेंडरनुसार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थी (ganesh chatu...

कमी पटसंख्येच्या शाळांवर घाला; राज्यभरात समूह शाळांची निर्मिती .

Image
कमी पटसंख्येच्या शाळांवर घाला; राज्यभरात समूह शाळांची निर्मिती . राज्य शासनाचा निर्णय शिक्षण हक्क कायद्याचे (आरटीई) उल्लंघन करणारा आहे. समूह शाळेमुळे विद्यार्थ्याना त्यांच्या घरापासून १ किंवा ३ किलोमीटरच्या आत शाळा उपलब्ध होणार नाही. पुणे : शाळेतील कमी पटसंख्या, त्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यात येणाऱ्या अडचणी, कमी पटसंख्येमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना निर्माण न होणे अशी कारणे देत राज्य सरकारने २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा समूह शाळांमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गाव तिथे शाळा या संकल्पनेला आता छेद जाणार असून, समूह शाळांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी १५ ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे. शिक्षकांची खासगी कंपन्यांमार्फत कंत्राटी भरती, खासगी कंपन्यांकडून सीएसआर निधी घेऊन त्यांची नावे शाळांना देण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयावर आधीच टीकेची झोड उठली आहे. त्या पाठोपाठ आता समूह शाळांचा विषय पुढे आला आहे. शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात १ ते २० पटसंख्येच्या १४ हजार ७८३ शाळा आहेत. त्यात १ लाख ८५ हजार ४६७ विद्यार्थी, तर २९ ...

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पोलिसांनी संमती नाकारली, 'हे' आहे कारण

Image
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पोलिसांनी संमती नाकारली, 'हे' आहे कारण   गौतमी पाटील ही महाराष्ट्रातली सुप्रसिद्ध नृत्यांगना आहे 'सबसे कातील गौतमी पाटील' म्हणून फेमस असलेली नृत्यांगना म्हणजे गौतमी पाटील. करवीर आणि राधानगरी तालुक्यातील गौतमी पाटीलच्या कारयक्रमांना संमीत नाकारण्यात आली आहे. कार्यक्रमाचे आणि आयोजन बंदोबस्ताचं कारण देत पोलिसांनी ही संमती नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात असे कार्यक्रम आयोजित करु नये असं आवाहनही जिल्हा पोलीस प्रमुख महेश पंडीत यांनी केलं आहे. काय म्हटलं आहे पोलिसांनी ? गौतमी पाटीलचा जो कार्यक्रम ठेवण्यात आला होता, त्याला पोलिसांनी संमती दिलेली नव्हती. राशिवाडे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तिथेही आम्ही परवानगी दिलेली नाही. हे कार्यक्रम रद्द करण्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की, संपूर्ण जिल्ह्यात गणेश उत्सव सुरु आहे. गणेश उत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीस दल रस्त्यावर आहे. ज्या कार्यक्रमांना गर्दी जमते अशा कार्यक्रमांना परवानगी देणं हे आम्हाला शक्य होणार नाही. यापूर्वीचे या कार्यक्रमातले अनुभव लक्...

'हो, पक्षात फूट नाही, अध्यक्ष बदलले', जयंत पाटलांच्या वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया .

Image
'हो, पक्षात फूट नाही, अध्यक्ष बदलले', जयंत पाटलांच्या वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया . जयंत पाटलांच्या 'त्या' वक्तव्यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटलांच्या 'त्या' वक्तव्यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटलांच्या वक्तव्यावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. काही नेते वगळता आमदार कोणत्या गटाचे हे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत राजकीय नेत्यांसह लोकांमध्ये संभ्रम आहे. पक्षात फूट नसल्याचा दावा दोन्ही गट करत आहेत. एकूणच राष्ट्रवादीत फूट पडल्याचे निवडणूक आयोगाने मान्य केले आहे. तसेच दोन्ही गटांना 6 ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी बोलावण्यात आले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. शरद पवार यांनी पक्षात फूट नसल्याचे सांगितले, तर जयंत पाटल यांनी आरोप केला की, निवडणूक आयोगाने ६ ऑक्टोबरला पक्ष विभाजनाची सुनावणी निश्चित केली आहे. जयंत पाटलांच्या...

G20 शिखर परिषद: रशियाचा निषेध न करता नवी दिल्ली घोषणा सर्वांसाठी एक नाजूक विजय .

Image
 G20 शिखर परिषद: रशियाचा निषेध न करता नवी दिल्ली घोषणा सर्वांसाठी एक नाजूक विजय . जगातील सर्वात वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थेसाठीही, रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आणि परिणामी अन्न आणि ऊर्जा असुरक्षितता - या दोन सर्वात विभाजित समस्यांचे वर्णन करण्यासाठी भाषेवर G20 देशांमधील एकमत तयार करणे जवळजवळ अशक्य मानले जात होते. त्यामुळे, अशी अपेक्षा होती की भारतीय राष्ट्रपती संयुक्त निवेदन किंवा संभाषणात पोहोचू शकणार नाहीत. परंतु, 9 सप्टेंबर रोजी, दोन दिवसीय शिखर परिषदेच्या पहिल्या दिवसाच्या अर्ध्या मार्गावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली नेत्यांची घोषणा स्वीकारण्याची घोषणा केली. G20 शेर्पा अमिताभ कांत यांनी त्वरीत X, पूर्वीचे Twitter वर नेले आणि सांगितले की घोषणा सर्व विकासात्मक आणि भौगोलिक-राजकीय मुद्द्यांवर 100 टक्के सहमतीने पोहोचली आहे. तथापि, बाली घोषणेतून युक्रेनमधील संघर्षाच्या आसपासच्या भाषेतील महत्त्वपूर्ण समायोजनांमुळे भारताला G20 सदस्यांकडून एकमताने पाठिंबा मिळण्यास मदत झाली यात काही शंका नाही. नवी दिल्ली विरुद्ध बाली पहिली गोष्ट म्हणजे, नवी दिल्ली घोषणेमध्ये रश...