"राज्यातील मध्यान्ह भोजन योजना घोटाळ्याची कामगार आयुक्तांमार्फत होणार चौकशी",
"राज्यातील मध्यान्ह भोजन योजना घोटाळ्याची कामगार आयुक्तांमार्फत होणार चौकशी", कामगार मंत्र्यांची घोषणा आज सभागृहात हा मुद्दा आल्यानंतर कामगार मंत्री सुरेश खाडेंनी महत्त्वाची घोषणा केली मध्यान्ह भोजन योजनेच्या घोटाळ्याचा विषय आज सभागृहात मांडण्यात आला. या प्रकरणी जे प्रश्न विचारण्यात आले त्यानंतर कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी या प्रकरणाची कामगार आयुक्तांमार्फत चौकशी होईल असं आश्वासन दिलं आहे. त्यांनी ही घोषणा केली मध्यान्ह भोजन योजना आणि कामगारांना जे साहित्य वाटप करण्यात आलं आहे त्या सगळ्याची कामगार आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येईल. सुरेश खाडे यांनी आणखी काय म्हटलं आहे ? जिल्हा स्तरावर कामगारांना जी घरं दिली जातात किंवा इतर योजनेच्या अंतर्गत सोयी पुरवल्या जातात त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची समिती नेमली जाईल आणि अंमलबाजवणी व्यवस्थित होते आहे का? याकडे ही समिती लक्ष ठेवणार आहे. बांधकाम कामगार महामंडळाच्या १६ हजार कोटींच्या ठेवी आहे त्याचा विनियोग योग्य प्रकारे व्हावा आणि कामगारांसाठीच्या योजना चांगल्या प्रकारे राबवल्या जाव्यात यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती क...