Posts

Showing posts from May 12, 2025

स्‍मृति मंधानाने ठोकले वनडे करिअरचे 11 वे शतक, श्रीलंकेविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी

Image
❤️ स्‍मृति मंधानाने ठोकले वनडे करिअरचे 11 वे शतक, श्रीलंकेविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी .. भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना हिचा वनडे क्रिकेटमधील जबरदस्त प्रवास सुरूच आहे. कोलंबो येथे झालेल्या त्रिकोणी मालिकेच्या अंतिम सामन्यात तिने श्रीलंकेविरुद्ध कारकिर्दीतील 11 वे शतक झळकावून इतिहास रचला आहे. 101 चेंडूंमध्ये 116 धावा करत स्मृतीने भारतीय संघाला 50 षटकांत 7 गडी गमावून 342 धावांपर्यंत नेले. ही धावसंख्या श्रीलंकेसाठी एक आव्हानात्मक लक्ष्य ठरली. ❤️ शतकासह मोठा विक्रम या शतकासह स्मृतीने महिला वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. ती आता ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंग (15 शतके) आणि न्यूझीलंडच्या सूजी बेट्स (13 शतके) यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. तिने इंग्लंडच्या टैमी ब्यूमोंटला मागे टाकले असून, ब्यूमोंटच्या नावावर 10 शतके आहेत. ❤️ स्मृतीची जबरदस्त खेळी स्मृती मांधनाने 15 चौकार आणि 2 षटकारांसह 116 धावांची खेळी केली. तिचा स्ट्राइक रेट 114.85 इतका होता. डावाची सुरुवात करताना तिने प्रतिका रावलसोबत 70 धावांची भागीदारी केली. प्रति...