गेवराईत 'त्रि' कोन पंडित , पवार आणखी कोण - क्रॉसलाईन धनगर माळी आणि बंजारा
गेवराईत 'त्रि' कोन
पंडित , पवार आणखी कोण - कोण
क्रॉसलाईन
धनगर माळी आणि बंजारा - वंजारा असा ओबीसीचा मोठा टक्का असलेला मतदार आकुंचन पावला जात असल्याचे चित्र आहे , यावरून गेवराईत कोण हा सवाल उत्तरीत करूयात म्हणजे कयास पातळीवर . तसा तालुका पंडित पवारांच्या थोरल्या पिढी संघर्षातून अर्थात माधवराव शिवाजीराव या दिग्गज नावांनी तालुका आपल्या वसरीवर ठेवला , मात्र पंचायत समितीच्या चाव्या वरून पुतणे बदामराव बाजूला सरकले , नवगण गणपती व परळीचा वैद्यनाथाचा आशीर्वाद घेऊन १५ वर्षे बदामराव पंडित विधान सभेत राहिले. रांगड्या स्वभावाचा हा धनी माणूस हौसेने आमदार होत राहिला , पंडित मुक्तीने आणि बाळराजे पवारांची शहरातील कुमक कामाला लागल्याने लक्ष्मण पवार आमदार झाले , पवारांच्या दुसऱ्या पिढीने १० वर्षे मागे टाकताना लोकमान्यता मिळवली , अगदी द्यायचे तर द्या नाहीतर देऊ नका या टोकाचा प्रचार करून एकतर्फी मतदार जिंकणारा आमदार म्हणून लक्ष्मण पवारांनी पंडित कोंडी फोडली . शालीन आणि सरळ असलेले लक्ष्मण पवार २४ च्या आखाड्यात तिसऱ्यांदा येतील का ? काम मग थांबतील अशी एक शंका आहे कारण , वर्तमान वातावरण दुषित असल्याचा त्यांचा स्वतचा निष्कर्ष असल्याने हात नको पोळायला म्हणून काढता पाय घेत असल्याची कुजबुज आहे , जर पवार शर्यतीत नसतील तर मग कोण हा प्रश्न पुन्हा पंडिताकडे घेऊन जातो . आघाडीचे उमेदवार जर बदामरावच असतील त्यांना सर्वाधिक संधी असेल , याची थेट कारणे म्हणजे पूर्ववत गावनिहाय यंत्रणा , सेना तुतारी आणि सेकुलेर मतदार आता विना अट परिवर्तनाची मशाल घेऊन धावत असल्याचे चित्र आहे , दुसरे पंडित म्हणजे विजयराजे , यांच्या आमदारकीचे योग आणि त्यांच्या क्षमता यांच्यात तफावत आहे , कष्ट आणि कष्टातले सातत्य कायम असून देखील त्यांच्या शक्यतेचा पारा तळ सोडताना दिसत नाही , मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या अगदी उशाला असलेला गोदाकाठ भरलेला आणि भारलेला आहे , यातून मतदारांची सरळ वाटणी झाली आहे आणि यातून शिवछत्रच बांधावर आल्याचे चित्र आहे . मराठा आणि ओबीसी हे दोन्ही थपके आपले स्वतंत्र पर्याय शोधत आहेत आणि मांडत आहेत . माळी बंजारा आणि धनगर असे तीन हि हेड चे एक एक चेहरा आमदारकीच्या वाटेवर चालतो आहे यातून गेवराईत पहिल्यांदा काही घडत आहे तर ते म्हणजे , पंडित पवारांच्या शिवाय देखील आमदार होऊ शकतो . मनोज जरांगे यांच्या सोबतचे महेश दाभाडे देखील पवार पंडित मुक्तीचा नारा देण्याच्या तयारीत आहेत . कधी काळी पंडितांच्या चिमटीत कुणी घुसावे अशी भीती असायची , मोहन काळे सारखे काही प्रयत्न झाली मात्र फसली , पवारांनी सुरंग लावला आणि आता वर्तमान काळात तर इच्छुक पहिल्यांदा तीन पेक्षा अधिक समोर खुली झाली आहेत . लोकशाहीच्या दृष्टीने आश्वासकच चित्र आहे , काम करा नाहीतर घरी बसा , माणसात मिसळा माणसांच्या सुख दुखात मिसळा नसता , निवडणुकीत आव्हान स्वीकारा असा काळ गेवराईत आहे . बीड च्या सभेत मनोज जरांगे यांनी श्रीमंत मराठ्यांना घरी बसवण्याचा चंग शब्दबद्ध केला त्या वरून मराठा सामान्य मतदार गेवराईच्या प्रस्थापित परिघातून ढांग टाकून बाजूला जात असल्याचे चित्र आहे , यामुळे दोन्ही पंडित आणि पवार या निकषात मोठा मतदार गमावून बसतील आणि प्रा लक्ष्मण हाके यांनी गेवराईत ओबीसीचा आमदार म्हटल्याने ओबीसी देखील दोन्ही पंडित व पवार या मराठा उमेदवाराकडे जाणार नाही , पर्यायाने मुख्य लढत वरील वर्गवारी लक्षात घेता , पंडीत पवार वगळता झाली तर आश्चर्य नको . बाकी शीतल -पूजा या लेकी रिंगणात फिरतात , त्यांना काही साधले जाईल का हे कोड आहे मात्र चार मत पदराला बांधून मात्र नक्की घेतील आणि हे निकालाच्या फरकात पाचर मारणारे ठरल कि काय माहित .
Comments
Post a Comment
JD