बालपणीची दिवाळी
बालपणीची दिवाळी ...... लहानपणी दिवाळी आली की आठ दिवस अगोदर आम्ही वस्तीवरची सारी पोरं जमून रोज प्रत्येकाच्या घरी जाऊन गायांना ओवळायचो . त्यांच्यासमोर दिवाळीची गाणी म्हणायचो. एक दगडाचा दिवा असायचा आमच्या घरी तो लाऊन लावून रोज गायांची पूजा करायचो व त्यांच्या समोर दिवाळीची गाणी म्हणायचो. दिवा लावण्यासाठी रोज एक एक जनाचा नंबर असायचा तेल आणण्याचा. जवळ जवळ सगळ्यांच्याच घरी दोन ते तीन गावरान गाया हमखास असायच्या. आमच्या घरी तर सहा ते सात नेहमी असायच्या. आता एकच उरली आहे. दिवाळी होईपर्यंत रोज आम्ही गाया समोर गाणी म्हणायचो. सर्वच गाणी आठवत नाहीत आता पण जी लक्षात आहेत ती पुढीलप्रमाणे.. १. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी... २. साधू माधु पेल्यात ताक, ताक पेऊन पडल्यात गार ३. गाय येली मोरी ग्यानबा ,मोरीला झालाय गोऱ्हा ४. नऊ नऊ दारानं, नऊ नऊ पिलं हो या सारखी अनेक गाणी आम्ही रोज गायांना ओवळताना म्हणायचो त्यातलच हे एक पाठ असलेलं गाणं एक आठवण म्हणून "माझी गवळण गाय" माझी गवळण गाय बरीहो....... द...