*कुणी लिहिलंय माहीत नाही,**पण आम्हीं अनुभवलंय;**हे वास्तव आहे....*
*कुणी लिहिलंय माहीत नाही,* *पण आम्हीं अनुभवलंय;* *हे वास्तव आहे....* *तीन चांगल्या गोष्टी* आमच्या बाबतीत सुदैवाने लवकर झाल्या. १) मॅगी यायच्या आत आम्ही *मोठे* झालो._ २) Mobile यायच्या आत आमचे *शिक्षण* झाले. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ३) Whatsapp यायच्या आत आमचे *लग्न* झाले. आमच्या लहानपणी इंग्रजीचं फॅड अजिबातच नव्हतं. ABCD .......XYZ याचा संबंध *फक्त शाळेत* गेल्यावर, ते ही इंग्रजीच्या तासालाच ! आणि आता ABP माझा, CID, MRI, X-ray, Blood, Star TV, Z-TV *विचारूच नका.* आमच्या लहानपणी, *This is Gopal. आणि That is Seeta.* ही दोन वाक्ये पाचवीत गेल्यावर वाचता यायचे, तरी घरी *जबरदस्त कौतुक* व्हायचं ! आई लाडानं जवळ घ्यायची आणि मायेनं मुका घ्यायची. आई लेकराकडे इतक्या कौतुकाने पहायची, की त्या पोराला *एकदम कंडक्टर* झाल्या सारखंच वाटायचं ! अहो कंडक्टर याच्यामुळे की ..... आमच्या लहानपणी एखाद्या पोराला मोठ्या माणसाने विचारले, हं sss काय रे बाळा, मोठेपणी तू काय होणार ? असा प्रश्न विचारला की ते पोट्टं हमखास म्हणायचं ..... *मी मोठेपणी कंडक्टर* होणार किंवा *पोलीस* होणार ! तुम्हाला खोटं वाटे...