धनगर व वडार समाजाला एस्. टी. आरक्षण लागू करण्यासाठी आमरण उपोषण




धनगर व वडार समाजाला एस्. टी. आरक्षण लागू करण्यासाठी आमरण उपोषण

बीड : देशातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यात धनगर व वडार समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षणाची अंमलबजावणी करा त्यामुळे या दोन्ही समाजाच्या उन्नतीसाठी, प्रगती होईल म्हणून भाई आकाश निर्मळ यांनी धनगर व वडार समाजाला एस.टी. प्रवर्गातून आरक्षण लागू करा या मागणीसाठी त्यांनी लोकशाही मार्गाने उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे आजचा त्यांचा दुसरा दिवस आहे. उपोषणकर्ते भाई आकाश निर्मळ यांना पाठिंबा देण्यासाठी येणारा प्रत्येक जण आपली भावना व्यक्त करताना धनगर व वडार समाजाची फसवणूक करून मराठा ओबीसी वाद पेटविण्याच्या तयारीत असल्याचे सांगत आहेत 
धनगर व वडार समाजाची मुळ एस.टी आरक्षण आहे पण त्याची अंमलबजावणी आजपर्यंत सत्तेत आलेल्या सरकारने केली नाही. 
कारण देशातील ईतर राज्यात धनगर व वडार समाजाला एस.टी आरक्षण लागू आहे पण फक्त महाराष्ट्र राज्य सरकारच्या गलथान कारभारामुळे ते आजपर्यंत लागु झाले नाही. 
हे सर्व सोडून ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष करत फिरणारे स्वयंघोषित नेते समाज द्रोह करीत असल्याचे मत उपस्थितांकडून व्यक्त केले जात आहे.
भाई निर्मळ यांचे आमरण उपोषणाची मुख्य मागणी धनगर व वडार समाजाला एस.टी. प्रवर्गातून आरक्षणाची लागु करा अशी आहे. 
यावर राज्य सरकार गेल्या ३३ वर्षापासून जाणिवपूर्वक चालढकल पणा करत असून त्यावर धनगर समाजाचे नेते काही न बोलता बघ्याची भूमिका घेऊन स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी पदे मागत हात पसरताना दिसत आहेत. 
या नेत्यांनी धनगर व वडार समाजाच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे ते मुळ मागणी सोडून निरर्थक मुद्दावर लढा देऊन राज्यात ओबीसी मराठा यांच्यात संघर्ष पेटविण्याचा प्रयत्न करून सत्तेत जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. 
मात्र यातून धनगर व वडार समाजाचे मोठे नुकसान होणार आहे. ते स्वघोषित नेते मागच्या दाराने आमदारकी, खासदारकी, महामंडळे लाटुन स्वतःचा आणि स्वतःच्या आप्तेष्टांचा विकास करत आहेत पण धनगर समाजाची मुळ मागणी ही एस.टी. आरक्षणाची असताना ओबीसी आरक्षणासाठी मराठा समाजाच्या अंगावर लावुन धनगर व वडार समाजाचे नुकसान होणार आहे. 
त्यामुळे धनगर व वडार समाजाने आपल्या एस् टी आरक्षण अमलबजावणी पासून तसुभर न ढळता हा लढा नेटाने पुढे नेऊन जोपर्यंत एस् टी प्रवर्गात अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत सातत्याने लढत राहायचे आहे! 
समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करणार्‍या स्वार्थी बांडगूळ, दलबदलुच्या, संधी साधुं पुढाऱ्यांपासून वेळीच सावध झाले पाहिजे नसता दोन्ही समाजाची अतोनात हानी होईल असे मत भाई आकाश निर्मळ यांनी व्यक्त केले.
या वेळी भटक्या विमुक्त चळवळीचे नेते समाज भुषण मा. शंकर विटकर यांनी आपली भुमिका स्पष्ट करताना म्हटले की, धनगर आणि वडार समाज महाराष्ट्र राज्याच्या बाहेर एस.टी. आरक्षणात असल्यामुळे राज्यातील धनगर आणि वडार समाजाचा एस.टी. आरक्षणात समावेश करावा. आमचा सामान्य लोकांना आपला नेमका लढा काय आहे याची जाणिव नसल्याने ते जातीय तेढ निर्माण करू पाहणा-या लोकांच्या संगतीत स्वतःच्या समाजातील जनतेला भरकवटत आहेत. त्यामुळे समाजात विभागणी होऊन यातून केवळ संधीसाधुंचा फायदा न होऊन देता कामा नये. त्यामुळे राज्यातील धनगर आणि वडार समाजाने मोठा ताकदीने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. 
यावेळी शिवसंग्रामचे युवानेते डॉ राजेंद्र बंड, भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे बीड जिल्हा सहचिटणीस भाई शाकेर सय्यद बीड शेकाप तालुका चिटणीस अँड. भाई राजेंद्र नवले शिदोडचे माजी उपसरपंच पांडुरंग शेंडगे, युवा उद्योजक रवींद्र बहिर, उद्योजक डाके साहेब, प्रा.संदीप गांडगे यांनी भाई निर्मळ यांची भेट घेऊन त्यांच्या उपोषणाला भेट देऊन जाहिर पाठिंबा दिला. 
यावेळी दादा वीटकर, सुधाकर धोत्रे, आश्रुबा चौगुले, युवा कॉग्रेसचे दत्तात्रेय प्रभाळे. पत्रकार अंकुश गवळी, धनगर समाजाचे युवा नेते अमर वाघमोडे, प्रा.शरद झोडगे, गेवराई तालुक्याचे युवानेते ॲड.बाळासाहेब सोलनकर, प्रवीण पालमकर, अजय जाधव, अच्युतराव चन्ने, जालिंदर गाडेकर, मोतीराम चादर,गोपाल गाडे, बाळासाहेब गाडेकर,दादाजी धापसे यांच्यासह धनगर व वडार समाजाचे शेकडो लोक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

▪️अखेर बीड बायपासवर उड्डाणपुल, सर्व्हिस रोडच्या निघाल्या निविदा▪️केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी बीडकरांना दिलेला शब्द पाळला.

अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव येथील

चक्क पोलीस चौकी समोरच तरुणावर चाकू, कोयत्याने प्राणघातक हल्ला....!!!