महिला सुरक्षा वाऱ्यावर! दारूड्या पाेलिसांने घरात घुसून धरला महिलेचा हात; ग्रामस्थांना चोपले.
महिला सुरक्षा वाऱ्यावर! दारूड्या पाेलिसांने घरात घुसून धरला महिलेचा हात; ग्रामस्थांना चोपले धारूर : धारूर पोलिस ठाण्यातील एका हवालदाराने दारूच्या नशेत तालुक्यातील एका गावातील महिलेचा घरी जावून हात धरला. महिलेने आरडाओरडा करताच ग्रामस्थ जमा झाले. त्यानंतर या दारूड्या पोलिसाला ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला. आता या हवालदाराविरोधात धारूर ठाण्या गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू असून रात्री पर्यंत त्याचे निलंबण होण्याचीही शक्यता आहे. धारूर पोलिस ठाण्यातील एक कर्मचारी सोमवारी रात्री उशिरा दारू पिऊन तालुक्यातील एका गावात गेला. अंधाराचा फायदा घेत एका घरात जावून त्याने महिलेचा हात धरला. यावेळी महिलेने आरडाओरडा केला. त्यामुळे नातेवाईकांसह ग्रामस्थ जमा झाले. त्यानंतर या दारूड्या पोलिसाला सर्वांनीच चोप दिला. तेथून त्याला धारूर पोलिसांच्या स्वाधीन केले. मंगळवारी सकाळीच हे सर्व नातेवाईक गुन्हा दाखलसाठी पोलिस ठाण्यात आले, परंतू धारूर पोलिसांनी प्रकरण मिटवून घेण्यासाठी प्रयत्न केले. परंतू नातेवाईक निर्णयावर ठाम राहिल्याने या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. धार...