Posts

Showing posts from December 5, 2023

प्रवास नेमकाच ग्रॅजुयट झाल्यानं मलं पोस्ष्ट ग्रॅजुएशनसाठी औरंगाबादलं जायाच व्हतं.

प्रवास              नेमकाच ग्रॅजुयट झाल्यानं मलं पोस्ष्ट ग्रॅजुएशनसाठी औरंगाबादलं जायाच व्हतं. तिथल्या कॉलेजात मव्हा नंबर लागला व्हता.पहाटं नवची एष्टी व्हती.नवनंतर एष्टी नसल्यानं म्या पाहाटं लवकरच गडबडीनं  आटपुण निंघायची तयारी केली.निघंतानी पुन्हा एकदा कागदपत्र निट तपासले.मायनं गडबडीत दोन चार भाकरी आन मिरचीचा ठेचा मलं बांधुन देलता.गावापसुन एष्टी थांबा तिनेक किलोमिटर लांब आसल्यानं मि साडेसातलच घराबाहीर पडलो.सगळा सस्ता सामसुम व्हता.मी आपलं एष्टी हुकु नाही मनुन झपाझप चालत एकदाचा फाट्यावर येऊन एष्टीची वाट पहात बसलो.फाट्यावर ना निवारा व्हता ना पाण्याची सोय व्हती.तिथं मह्या सारखे एक दोन प्रवासी आन दोनचार मोकाट कुत्रे सोडले तं काय बी नवतं.एष्टीचा नवचा टाईम व्हता.साडेनव झाले तरी आंजुक एष्टि आली नवती.म्या आपला तिन तिनदा घड्याळात टाईम पाहु लागलो.मलं हि एष्टी हिंगोलीलोकच व्हती.तिथुन आकरा वाजताची एष्टी पकडायची व्हती.मह्या मनाची तळमळ व्हवु लागली.आकराची एष्टी चुकली तं डबल तिनलोक दुसरी गाडी नवती.आश्यात औरंगाबादलं जायालं उशीर झाला आसता.मी ईचार करतच व्हतो तेव्हड्य...

शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.

Image
' शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार साहेब व मान्यवर बीड जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांच्या समवेत गोपीनाथ गड येथे जाऊन लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केले, तसेच प्रभू वैद्यनाथांचे दर्शन व विधिवत पूजन केले.  परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील 286.68 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन यावेळी संपन्न झाले. त्याचबरोबर परळी एमआयडीसी, कृषी महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, सोयाबीन संशोधन व प्रक्रिया केंद्र, बीड जिल्हाधिकारी कार्यालय, बीड मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कृषी भवन बीड, परळी शहर बस स्थानक यांसह विविध सुमारे दीड हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.  कृषी उत्पन्न बाजार समिती परळी अंतर्गत सिरसाळा ता.परळी येथील कै.पंडित अण्णा मुंडे व्यापारी संकुलाचे यावेळी लोकार्पण संपन्न झाले.  या कार्यक्रमात कृषी, सामाजिक न्याय, यांसह विविध विभागाच...