Posts

Showing posts from December 23, 2023

होय साहेब ,तेवढी विहीर लावून द्या की सात बाऱ्याला , हो,"

Image
होय साहेब ,तेवढी विहीर लावून द्या की सात बाऱ्याला , हो," का नाही लगेच' म्हणून चहाच कप संपवून तलाठी साहेबानी किक मारली आणि ,या तहसीलात म्हणून गेला चहाचे पैसे शेतकऱ्यांनी दिले आणि गडबडीत पायी तो तहसील कडे गेला जाऊन तालाठ्याला दिसेल अश्या जागी जाऊन बसला ,पंधरा मिनिटात तो कसाबसा चेहरा करून त्याच्यावर खेकसून लगेच आले काय इकडं , हो तुमीच म्हणले होते म्हणून आलो साहेब ,बरं असं नसतंय होत त्याला तुमचा कागदपत्रे लागतात आणि उद्या या आज मीटिंग आहे उद्या भेटू, तेव्हा शेतकरी उठला आणि काम अरद्याच्या वर झालय असा आनंद तोंडावर घेऊन तो गावाकडं निघाला . जाताना जिलेबीच दुकानाकडे पाहिलं पण कापूस वेचणाऱ्या लेकराला न्हयायची त्याची हिम्मत नाही झाली .बांधलेली बैलं दीनवणी त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती , कुठं गेला होता सकाळीच तहान लागली म्हणून..तेवढ्यात म्हशी फिरत होत्या , अंगातल शर्ट काढलं आणि बैलांना पाणी दाखवून सावलीला बांधलं ,म्हशीला करकर चारा कापून आणून घातला तसा त्यांनी मोठा पुण्याचा सुस्कारा सोडला , तसा खिशातली तंबाखू काडून खाली ,न्हयारीची भाकर दुपारी दोन वाजता खाल्ली .उद्या अजून...