कोकण रेल्वेच्या जन्माची कथा :
कोकण रेल्वेच्या जन्माची कथा : असामान्य धाडस आणि अफलातून इंजिनिअरिंगची कमाल…! सुट्टीमध्ये किंवा सणवारी जर कोकणातल्या मामाच्या घरी जायचं असेल तर आधी बाय रोड जाण्याशिवाय पर्याय नव्हता. बाय रोड जायचं म्हटलं तर रस्ता कठीण आणि वेळ सुद्धा खूप लागायचा. अशा वेळी कोकणातल्या सर्वांना आणि कोकणात जाणाऱ्यांनाही असे वाटायचे की, सगळीकडे मेली रेल्वे आली. आपल्या कोकणाक कधी यायची ही आगगाडी? १९९३ सालापर्यंत मुंबई ते मंगलोर, कोकण, गोवा व कर्नाटक, केरळच्या तसेच दक्षिण भारतातील किनाऱ्यावरच्या गावांसाठी डायरेक्ट रेल्वेची सोय नव्हती. अखेर आठ वर्षांच्या भगीरथ प्रयत्नांनंतर प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी १९९८ साली कोकण रेल्वेची सर्व किनारपट्टी कव्हर करणारी गाडी धावली. कोकण रेल्वे सुरु व्हायच्या आधी २ मोठी बंदरं असलेली शहरे म्हणजेच मुंबई आणि मंगलोर एकमेकांशी डायरेक्ट रेल्वेने जोडलेली नव्हती. लोकांना त्या भागात जायचे असेल तर पुणे-बेळगाव-बंगळूरू अशा रूटच्या ट्रेनने जावे लागायचे. मंगलोर हून मुंबईला यायचे असल्यास लोकांना आधी कादूर किंवा बिरूरला बसने जावे लागायचे आणि मग तिथून मुंबईसाठी ट्रेन पकडावी ल...