ग्रामीण संघर्षमय व हृदयस्पर्शी कादंबरी " हेलपटा " ................. तुमचं आमचं जगणं म्हणजेच ,, हेलपाटा ,, " बिजलेला बाप " एक आठवण ............!!!
ग्रामीण संघर्षमय व हृदयस्पर्शी कादंबरी " हेलपटा " ................. तुमचं आमचं जगणं म्हणजेच ,, हेलपाटा ,, " बिजलेला बाप " एक आठवण ............!!! १९८४ साल उजाडलं आम्ही सर्वजन वाण्याच्या गुर्हाळावरचं राहु माधवनगरला रहात होतो . रखरखनारा उन्हाळासंपुन पावसाळा सुरु झालेला होता . जास्त पाऊस लागला तर गुर्हाळ चार-चार दिवस बंद रहायचे . आषाढ महीना संपुन श्रावणाचे आगमन झाले होते . पावसाळ्यात खुप पाऊस पडला तर सर्वञ चिखलाचे साम्राज्य पसरायचे . गुराढोरांना चारासुद्धा आणता येत नव्हता . अशातचं मंगलताईचं लग्न करायचं हे भाऊंच्या डोक्यात होतं . दिवाळी झाली व तुळशीचे लग्न झाले की देवू बार उडवून असे भाऊंनी मनोमन ठाणले होते .पैसा तर एक जवळ नव्हता ! वाण्याकडुन उचल घ्यायची म्हणलं तर वाणी उचल द्यायचे एक हजार .... ती फेडायला पुढं वर्ष जायचं ! उचल काय फिटत नसे पुन्हा कर्जाचा बोजा अंगावर रहायचा . उचल आणणेसाठी 'बापुशेठ ' भाऊंना गावात ब...