Posts

Showing posts with the label Gevrai

श्री.विजयसिंह पंडित यांनी आयोजित केलेल्या 'खेळ पैठणीचा'.. माता-भगिनींच्या निखळ मनोरंजनाचा कार्यक्रम...!

Image
श्री.विजयसिंह पंडित यांनी आयोजित केलेल्या 'खेळ पैठणीचा'.. माता-भगिनींच्या निखळ मनोरंजनाचा कार्यक्रम...! शारदा प्रतिष्ठान, गेवराई आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धेचे पारितोषीक वितरण समारंभ निमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला माता भगिनींनी उदंड प्रतिसाद दिला. सुप्रसिध्द सिनेअभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिचे विविध गितावरील नृत्य उपस्थितांना मंत्रमुग्ध करून गेले. तिने कार्यक्रमाच्या आयोजनाचे कौतुक केले. सुप्रसिद्ध निवेदिक रमेश परळीकर यांच्या उत्कृष्ट संयोजनामुळे महिलांना आनंदाची अनुभूती मिळाली.. स्थानिक माता-भगिनींनी अत्यंत उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग घेत आयुष्यातील सर्व दुःख विसरून आनंदाचा अनुभव घेतला, विजेत्यांना रोख रकमेसह सन्मानाने बक्षिसे देऊन गौरविण्यात आले...

#जलशारदा जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री. अमरसिंह पंडित साहेब यांनी गेवराई तालुक्यात "प्रकल्प जलशारदा"

Image
#जलशारदा  जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री. अमरसिंह पंडित साहेब यांनी गेवराई तालुक्यात "प्रकल्प जलशारदा" हा महत्वकांक्षी प्रकल्प राबवून सिंचन सुविधा वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.   नाम फाउंडेशन आणि शारदा प्रतिष्ठान, गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे पाचेगाव ता. गेवराई येथे प्रकल्प जलशारदा अंतर्गत परिसरातील ओढ्याचे पाच किलो मिटर खोलीकरण, सरळीकरण, विस्तारीकरण आणि बंधाऱ्याचे पुनर्जीवन करण्याचे काम यावर्षी उन्हाळ्यात पुर्ण केले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे हे ओढे व त्यावरील बंधारे पाण्याने तुडूंब भरले आहेत. जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री. अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कामामुळे सुमारे शंभर ते दिडशे एकर शेती ओलिताखाली येणार आहे. बेली तांडा आणि पाचेगाव परिसरातील शेतकरी या कामामुळे अतिशय आनंदी आहेत.  माजी आमदार श्री. अमरसिंह पंडित साहेब यांनी राजकारणा पलीकडे जावून गेवराई तालुक्यातील सिंचनाच्या सुविधा वाढविण्यासाठी केलेले मोलाचे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.   Amarsinh Pandit Vija...

वीज पडल्याने आज तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यु झाला, या घटनेने मन सुन्न झाले.

गेवराई तालुक्यातील मौजे चकलांबा परिसरात वीज पडल्याने आज तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यु झाला, या घटनेने मन सुन्न झाले.  चकलांबा येथील विजया राधाकीसन खेडकर, लंकाबाई हरिभाऊ नजन, शालनबाई शेषेराव नजन या तीन महिला शेतात काम करताना असताना त्यांच्या अंगावर वीज पडून त्यात त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या मृत्यूची वार्ता अत्यंत दुःखद आहे.  त्यांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या परिवाराला हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो हीच आई भवानी चरणी प्रार्थना.

जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अमरसिंह पंडित साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त जेष्ठ पत्रकार श्री. संजय मालानी सर यांनी लिहिलेला लेख...

Image
#अभिष्टचिंतन  जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अमरसिंह पंडित साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त जेष्ठ पत्रकार श्री. संजय मालानी सर यांनी लिहिलेला लेख... धेय्यासक्त व्यक्तिमत्व संजय मालाणी ---       एखाद्या विषयात 'अभ्यास' करून एखाद्या धेय्याची निश्चिती करायची आणि मग त्यासाठीचा पाठपुरावा करायचा, त्यासाठी प्रसंगी कोणाचाही विरोध सहन करण्याची तयारी ठेवायची, कोणताही संघर्ष करण्याची तयारी ठेवायची पण ते धेय्य साध्य करायचेच असे व्यक्तिमत्व म्हणून माजी विधिमंडळ सदस्य अमरसिंह पंडित यांच्याकडे पाहता येईल. बीड जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्याचा विषय असेल किंवा शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, अमरसिंह पंडित यांची भूमिका नेहमीच आठवणीत राहील अशी राहिली आहे. --- मुंबईमध्ये अनेक ज्येष्ठ पत्रकारांसोबत ज्यावेळी बोलणे झाले, विशेषतः विधिमंडळ वृत्तांकन करणारे पत्रकार ज्यावेळी भेटतात, त्यावेळी बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीची आठवण ते हमखास काढतात, ती व्यक्ती म्हणजे अमरसिंह पंडित. राज्य विधिमंडळाचे माजी सदस्य ( विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहात त्यांनी काम केल...

उमापूर महसुल मंडळातील १५६२ शेतकऱ्यांनी खरीप हंगाम सन २०१६ साठी ४९,२२,१८५ रुपयांचा पिक विमा हप्ता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उमापूर शाखेत जमा केला होता.

Image
उमापूर महसुल मंडळातील १५६२ शेतकऱ्यांनी खरीप हंगाम सन २०१६ साठी ४९,२२,१८५ रुपयांचा पिक विमा हप्ता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उमापूर शाखेत जमा केला होता. बँक कर्मचाऱ्यांनी महसुल मंडळाची चुकीची नोंद केल्यामुळे त्यावेळी हे सर्व शेतकरी पिक विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहिले. केवळ बँक कर्मचाऱ्यांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे १५६२ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही. शेतकऱ्यांचा हा प्रश्न त्यावेळी विधान परिषदेत लावून धरला. सभागृहातील आश्वासनानुसार विमा कंपनी, बँक आणि शासन प्रतिनिधी यांच्यासमवेत मंत्र्यांच्या साक्षीने बैठकाही संपन्न झाल्या, मात्र यातून मार्ग निघाला नाही. शेवटी सन २०१८ मध्ये शेतकऱ्यांच्यावतीने मा.उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात जनहितार्थ याचिका क्र.७३/२०१८ दाखल केली. याचिकेत दि.२४ जानेवारी २०१९ रोजी न्यायालयाने आदेश पारीत करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७ टक्के व्याजदराने नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याचे आदेश दिले.  स्टेट बँक ऑफ इंडियाच्यावतीने मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाला मा.सर्वोच्च न्यायालयात आव्हानीत करण्यात आले. मा.स...