व्हॉट्सअप,इन्स्टा,रील्स,यु ट्युब,गावोगावचे हजारो चँनल्स,हजारो बाबा,दादा,महाराज, किर्तनकार आदीं यात भरपूर तेल ओतताहेत
बसमध्ये प्रवास करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे जनमानस कळतं.कोणाशी काहीही न बोलता,त्यांच्या जगात काय चाललंय याचा अंदाज येतो.माणसं परिस्थितीनं गांजून,वैतागून गेलीत. पण ही स्थिती कशामुळं निर्माण झालीय, याचं आकलन त्यांना होत नाही. असा समाज अधिकाधिक अंधश्र्ध्द,देव-धर्माला शरण जातो.आधीच समाज कालबाह्य रूढी-परंपरेत अडकलेला.त्यात अशी परिस्थिती. मी बारकाईने बघतो तेव्हा कळतं , हे मनोरुग्ण आहेत.विचार करण्याची क्षमताच त्यांनी गमावलीय.त्यात व्हॉट्सअप,इन्स्टा,रील्स,यु ट्युब,गावोगावचे हजारो चँनल्स,हजारो बाबा,दादा,महाराज, किर्तनकार आदीं यात भरपूर तेल ओतताहेत .प्रत्येकजण यापैकी कुठल्या ना कुठल्या सत्संगात तल्लीन आहेत.बसमध्येही कमी-जास्त हेच चित्र दिसतं.प्रत्येकजण यात व्यस्त आहे. वरवर साधी, सरळ वाटणारी माणसं कुठल्याही शुल्लक कारणावरून हाणामारीवर उतरतील ते सांगता येत नाही. बसमध्ये जागेवरून,खिडकी उघडी ठेवायची की बंद,यावरून एक-दोन भांडण होतातच.माणसं परिस्थितीसमोर अगतिक आहेत पण दुबळ्यासमोर आक्रमक आहेत.धार्मिक आहेत पण माणूस बनलेली नाहीत. माणूसपण कशाला म्हणतात तेच माहित नाही. त्यामुळं लोकश...