फेसबुकातले न्यायधीश आभास - वास्तवाच्या दरीत पिंट्या भरकटला
फेसबुकातले न्यायधीश आभास - वास्तवाच्या दरीत पिंट्या भरकटला माझ्या गावात नागोबाचा ओटा म्हणजे उताराला लागलेल्या एस ट्यां उभा असलेले स्थानक , शेतातल्या कामावरून थकून भागून आलेली , लेकरांना कामा नौकरीला लावून निवांत झालेली बाप मंडळी बसून गप्पा मारायची , इट्स शिराळ गप्पा . अगदी बराक ओबामा यांनी हे बेस केले पासून ते शंकराचार्य यांचे माप देखील इथे काढले जाते , मग कुणी अवास्तव बोलले कि त्याला गावकरी टोमणा असायचा , काहीही कसा बोलतो नागुबाच्या वट्यावर बसला कि काय , अगदी असेच फेसबुक नावाच्या वट्यावर अनेक नागोबा दिवस रात्र फुत्कार . आई माई वर शिव्या देऊनच युक्तिवाद प्रतिवाद केला पाहिजे असा नवा रिवाज फेसबुक वर सराईत झाला आहे . शहाण्यांनी बोलयचच नाही का तर म्हणे येड्यांची दहशत आहे . आपल्याला वाटते तसेच सर्वांना वाटावे हि मागणीपर भावना माज या मापकाने मोजावी या पातळीवर शब्दबद्ध होते . आड रानात बसून अर्ध बुद्ध कुणालाही आडवे घेतो , नंगे को खुदा डरे कुठल्या नालायकाने म्हण काढली राम जाने , कारण नंगे को खुदा कसला डरतो , नंगे को अद्दल घडवतो . मात्र नको ते प्रघात पडले , खुदा डरतो म्हटल्याव...