बीड जिल्ह्याची लढत #नेते विरूद्ध #जनता अशीच झाली.
ज्याला चंदनचोर म्हणून हिणवले... ज्याला बहुरंगी म्हणून हिणवले... तो शेतकरी पुत्र बीडचा खासदार झालाय..! बीड जिल्ह्याला एक शेतकरी पुत्र खासदार मिळाला याचा मनापासून अभिमान वाटतो. एका बाजूला जिल्ह्यातील ए टु झेड नेते तर दुसऱ्या बाजूला शेतकरी पुत्र आणि सामान्य जनता होती. बीड जिल्ह्याची लढत #नेते विरूद्ध #जनता अशीच झाली. निवडणूक लागल्यापासून बातम्या आणि वृत्तपत्रातून खूप वाचत होतो. शेतकरी पुत्र ताकदीने लढताना पाहून अनेकदा ह्रदय भरून आले. बाप लेकीचा तो विडिओ पाहून गहिवरलो. या निवडणूकीत आम्ही प्रत्यक्ष नव्हतो. पण झुंजारपणे लढणारा शेतकरी पुत्र पाहून वाटायचे हा माणुस जिंकणार! बीडच्या सभेत बप्पांनी #सगेसोयरे मागणी जाहीरपणे मांडली. राजकारण करताना काही निर्णय खूप धाडसी असतात. एका फाटक्या माणसाने हे धाडस दाखवले. त्याची परतफेड मतपेटीतून नक्कीच झाली. बप्पा... दिलेल्या शब्दावर ठाम रहा. बीड जिल्ह्याचा ऊसतोड मजुरांचा जिल्हा, मागास लोकांचा जिल्हा ही ओळख पुसण्यासाठी अस्सल मराठीतून संसद गाजवा. तुमच्या कार्यकाळात रेल्वे आणा... तूर्तास एवढेच! बप्पांचे अभिनंदन! Bajrang Sonwane