" पोळी "
"""""""""""" """""""""""""""" " पोळी " """"""""" निर्ढावलेल्या बोक्याला जेवण वाढा थोडं गढूळ पाणी देऊन थोडी मोडा त्याची खोडं ..... तेल नाही भाजीला गोंडराची पचव भाकर मलिदा तर खुप खाल्ला आता थोडा बन ' चाकर ' .... अरे, शेतामधल्या मालाची किंमत करता तुम्ही खालपासुन वरपर्यंत शेतमालाचे खातात ' दलाल ' लोणी ..... बाजार नाही म्हणुन कधी माल फेकावा लागतो रस्त्यावर शेतकर्याचे जीवन कठीण घेतात लोक सस्त्यावर ...... राब-राब राबुन त्याच्या जीवनाची होते ' होळी ' येथून-तेथून सारे एकच भाजतात त्याच्या पोटावर ' पोळी ' ✍️ Jivan Dhapse 7279828384 🔥🔥🎋🎋🍁🍁🌾🌾📗