...सैराट, फ्री हिट दणका, मुसंडी, गस्त या आणि अशा किती
चित्रपटात हिट पण पाय अजूनही जमिनीवरच...सैराट, फ्री हिट दणका, मुसंडी, गस्त या आणि अशा कितीतरी चित्रपटातून तानाजी गळगुंडे याने त्याच्या अभिनयाची छाप पाडली आहे. पण ग्लॅमरस दुनियेची झालर ओढून बसण्यापेक्षा मिळालेल्या पैशाचा योग्य वापर कसा करायचा हे तानाजीने त्याच्या कृतीतून दाखवून दिलं आहे. मनोरंजन क्षेत्रात यश मिळवूनही पाय जमिनीवर ठेवलेला तानाजी आजही शेळ्या राखताना दिसतोय. एवढंच नाही तर गावच्या शेतीतही त्याने सुधारणा केलेली आहे. पाण्याची सोय, शेतीचा पोत सुधारून तो आता शेतीत चांगला रमला आहे. अभिनय क्षेत्र हे बेभरवशाचे आहे याची जाणीव राखूनच तो शेतीत नवनवीन सुधारणा घडवून आणत आहे. याशिवाय तानाजीला लहान असल्यापासूनच पायात व्यंग होते. गेल्या काही वर्षांपूर्वी पायात असणाऱ्या हाडांच्या गॅपमुळे त्याला त्रास होऊ लागला होता. त्यामुळे शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. आजपर्यंत त्याच्यावर ७ शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. हा सगळा खर्च त्याने मिळालेल्या पैशातून केला आहे. कोणापुढे हात पसरवण्यापेक्षा मिळालेला पैसा योग्य जागी कसा गुंतवायचा हे त्याने त्याच्या कृतीतूनच दाखवून दिलं आहे.