Posts

Showing posts from May 1, 2024

"""""" शेती मातीच्या कविता """""""

Image
"""""" शेती मातीच्या कविता """""""          " मुक्त विद्यापीठ " ००००००००००००००००००० नाही वाचली पोथी- गाथा वाचली फक्त 'माती ' कष्टाच्या विद्यापीठात भेटली ज्वारी- बाजरीच्या कणसातील ' मोती '....१ कष्टाचे गिरवले सदा काळ्या मातीत पाठ मुठ धरुन नांगराची कधी सोडवली यठनाची गाठ .......२ दमलेले बैल विसावताना नाही मोजली कधी ' काकरी ' सर्जा- राजाचे मोल कसे विसरु सांगा? वर्षाची भाजते तव्यावर ' भाकरी '..३ थुई- थुई पावसातही भरले जसे अथांग ' सागर ' कुनब्यांचे भरले पेव , तवा देशाचे गहिवरले ' कोठार ' .....४ रानावनात तेंव्हा ....... पक्षांनी बांधली 'घरटी ' शोधुन सापडत नव्हती तेंव्हा चोरी करत नव्हती भूरटी .......५ अशी सधन तेंव्हा  निपजत होती पीढी बापा समोर कोणी ओढत नव्हता वीडी .....६             ✍️