Posts

Showing posts with the label Kolhapur

एकत्र कुटुंब..हे कुटुंब तब्बल २७ जणांचे..स्वतः तर जगतात,आणि आपल्या शेतीलाही मस्तपैकी जगवतात.

Image
एकत्र कुटुंब.. हे कुटुंब तब्बल २७ जणांचे..स्वतः तर जगतात,आणि आपल्या शेतीलाही मस्तपैकी जगवतात. आजच्या शहरी विभक्त कुटुंबपद्धतीत आदर्श .. कोल्हापूरतील हे कुटुंब तब्बल २७ जणांचे आहे. साबण, मीठ आणि चहापावडर या तीनच वस्तू ते विकत आणतात. बाकी तीळ, खसखसपासून ते वर्षभर पुरेल एवढ्या भाज्या, फळे, तेल, धान्य, डाळी ते शेतात पिकवतात. आवळ्यापासून फणसापर्यंत सगळ्या फळांचा मनसोक्‍त आस्वाद घेतात. बहुतेक पिकांसाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर केल्यामुळे हिरव्यागार टवटवीत भाज्या आहारात रोज वापरतात. सांगायची गोष्ट एवढीच, की घरातले सगळे मनापासून शेतावर राबतात आणि आनंदी, आरोग्यदायी जीवन जगतात. कोगे (ता. करवीर) येथील लहू सावबा मोरे यांच्या कुटुंबाची ही ताजी टवटवीत करणारी एक कथाच आहे. करवीर तालुका तसा शेतीच्या दृष्टीने सधन. मोरे कुटुंबाचीही साधारण 12 एकर जमीन. सगळा नुसता ऊस लावला तरी वर्षभर व्यवस्थित जगू शकणारं हे कुटुंब. पण, शेतीत स्वतः राबून, नवे प्रयोग करून विविध पिकं पिकवण्याचा या कुटुंबाला ध्यास. त्यामुळे केवळ उसावर भर न देता त्यांनी वेगवेगळ्या पिकांवर भर दिला आणि बाहेरून घरात फारसं विकत आणावया...

'मराठी भाषा गौरव दिनाच्या' खूप खूप शुभेच्छा.

Image
सर्वप्रथम महाराष्ट्रात, देशांत आणि जगभरात पसरलेल्या तमाम मराठी जनांना 'मराठी भाषा गौरव दिनाच्या' खूप खूप शुभेच्छा. मराठीत बोलणं, ह्या भाषेत नवनवीन ज्ञान, विचार, कल्पना जन्माला घालणं आणि त्यातून आपल्या भाषेची ताकद, त्याचा पैस, ह्याची जगाला जाणीव करून देणं ह्यातून आपण एक प्रकारे मराठी भाषेचा गौरव करतोच आणि खरंतर अशाच पद्धतीने फक्त आजच नाही तर ३६५ दिवस साजरा व्हायला हवा.  मागे मी म्हणलं तसं की मराठी ज्ञानाची भाषा व्हायला हवी. पण हे होत असताना बदलत्या प्रवाहांचा विचार व्हायला हवा. आजची तरुण पिढी दिवसातील बहुसंख्य वेळ विविध समाज माध्यमांवर असते. त्यातले अगदी सगळे नाही पण बऱ्यापैकी तरुण-तरुणी हे सामान्य दर्जाचे रिल्स बघण्यात त्यांचा वेळ घालवत असतात.  पण ह्याच सगळ्यांना विज्ञान ते आर्थिक संकल्पना ते अनेक विषयांवरचं माहिती, ज्ञान मराठी भाषेत मिळालं तर ते नक्की बघतील. मला माहीत आहे की आज मराठीमध्ये युट्युबसाठी खूप दर्जेदार कन्टेन्ट तयार होत आहे पण त्याचं प्रमाण निश्चित कमी आहे. आज विविध क्षेत्रांत खूप उच्च पदांवर काम करणारी मराठी माणसं आहेत, त्यांचा त्यांच्या क्षेत्रातील...