उमापूर महसुल मंडळातील १५६२ शेतकऱ्यांनी खरीप हंगाम सन २०१६ साठी ४९,२२,१८५ रुपयांचा पिक विमा हप्ता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उमापूर शाखेत जमा केला होता.
उमापूर महसुल मंडळातील १५६२ शेतकऱ्यांनी खरीप हंगाम सन २०१६ साठी ४९,२२,१८५ रुपयांचा पिक विमा हप्ता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उमापूर शाखेत जमा केला होता. बँक कर्मचाऱ्यांनी महसुल मंडळाची चुकीची नोंद केल्यामुळे त्यावेळी हे सर्व शेतकरी पिक विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहिले. केवळ बँक कर्मचाऱ्यांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे १५६२ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही. शेतकऱ्यांचा हा प्रश्न त्यावेळी विधान परिषदेत लावून धरला. सभागृहातील आश्वासनानुसार विमा कंपनी, बँक आणि शासन प्रतिनिधी यांच्यासमवेत मंत्र्यांच्या साक्षीने बैठकाही संपन्न झाल्या, मात्र यातून मार्ग निघाला नाही. शेवटी सन २०१८ मध्ये शेतकऱ्यांच्यावतीने मा.उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात जनहितार्थ याचिका क्र.७३/२०१८ दाखल केली. याचिकेत दि.२४ जानेवारी २०१९ रोजी न्यायालयाने आदेश पारीत करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७ टक्के व्याजदराने नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याचे आदेश दिले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्यावतीने मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाला मा.सर्वोच्च न्यायालयात आव्हानीत करण्यात आले. मा.स...