लहनपणचा सिनेमा
लहनपणचा सिनेमा . *********************** लहानपणी आमच्या शाळेसमोर, सिनेमावाला यायचा. पाचपैशात पंधरा मिनीटात, मुंबईला न्यायचा. वाघ सिंह हत्ती घोडे, सगळेच मधे असायचे. सगळं पहायला मात्र त्या वेळी, पाच पैसेच नसायचे. रडुन रडुन वडीला कडुन, पाच पैसे अनायचो. गुरुजींनी फिस मागितली असं, खोटं खोटं म्हणायचो. एव्हढ्याशा पेटीत वाघ सिंह, बसत असतील कसे. लहान सहान गोष्टीचं ही, केवढं कुतूहल असे. आता कितीतरी पिक्चर नुस्ते, डाउनलोड करता येतात. जसे पहायचे तसे किती ही, जोड तोड करता येतात. रहाट पाळण्याकडे नुसता मी, कुतुहलानं बघत राही. आता विमानात बसलं तरी ही, त्याचं काहीच वाटत नाही. विचार केला की नेहमी वाटतं, आता दिवस कसले आहेत. लहानपणचे ते प्रसंग काळजात, घर करुन बसले आहेत. हल्लीच्या या विज्ञान युगात, जुणं सगळं जळुन गेलं. माझ्या लहानपणा सोबतच, कुतुहलही पळुन गेलं. आता नेहमी मला वाटत राहतं पुन्हा एकदा लहान व्हावं । पोट दुखायचं निमीत्त करुन, शाळे मधुन पळुन यावं.